फोटो सौजन्य- pinterest
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाचा पाचवा दिवस ज्याला ऋषीपंचमी असे म्हटले जाते. यावेळी हा सण गुरुवार, 28 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. हा सण गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. मान्यतेनुसार, गणपतीची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, तर ऋषीपंचमीच्या दिवशी सप्तर्षींची पूजा केल्याने ज्ञान, संस्कृती आणि आत्मशुद्धीचा आशीर्वाद मिळतो. जी व्यक्ती या दिवशी पूजा आणि उपवास करतात त्यांना जीवनामध्ये आनंद, शांती आणि समृद्धी लाभते, असे म्हटले जाते.
ऋषीपंचमीच्या सणाच्या वेळी गंगेत स्नान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. यावेळी ऋषीपंचमीच्या पूजेसाठी मुहूर्त गुरुवार, 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11.5 ते दुपारी 1.39 पर्यंत राहील. यावेळी सप्तऋषींची पूजा करणे खूप शुभ मानले जाते.
ऋषीपंचमीच्या दिवशी महिला सप्त ऋषींची पूजा करतात यावेळी ऋषी कश्यप, ऋषी अत्री, ऋषी भारद्वाज, ऋषी वशिष्ठ, ऋषी गौतम, ऋषी जमदग्नी आणि ऋषी विश्वामित्र. या सात ऋषींना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या शक्तींचे प्रतिनिधित्व करणारे दैवी प्राणी मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी त्यांची पूजा केल्याने पापे दूर होतात आणि जीवनात शांती आणि समृद्धी येते.
ऋषीपंचमी हा सण किंवा उत्सव म्हणून साजरा केला जात नाही तर तो व्रत आणि शुद्धीकरणाचा विधी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिला व्रत पाळून अज्ञात चुकांसाठी क्षमा मागतात. तसेच आध्यात्मिक शुद्धीकरण आणि मोक्षासाठी देखील प्रार्थना केली जाते. या दिवशी सप्तर्षी, कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, वशिष्ठ, जमदग्नी आणि गौतम यांची पूजा करण्याची प्रथा आहे.
ऋषीपंचमीचा संबंध सप्तर्षींशी आहे. ज्याला हिंदू धर्मामध्ये ज्ञान आणि तपस्येचे प्रतीक मानले जाते. त्यासोबतच वेद, आयुर्वेद, ज्योतिष आणि संस्कृत यासारख्या ज्ञानाच्या शाखा त्यांच्या माध्यमातून विकसित झाल्या. असे मानले जाते की, या दिवशी जो कोणी पूजा करतो त्याला जीवनामध्ये धन, बुद्धी, संतती आणि आनंद मिळते.
ऋषीपंचमीला सप्तर्षींची पूजा झाल्यानंतर या गोष्टींचे दान करावे. यामुळे व्रताचे शुभ फळ मिळते, अशी मान्यता आहे. या दिवशी ब्राह्मणाला केळी, तूप, साखर इत्यादी दान करा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)