फोटो सौजन्य- pinterest
स्वप्नशास्त्रामध्ये स्वप्नात काही गोष्टी दिसण्याचा वेगवेगळा अर्थ सांगण्यात आलेला आहे. स्वप्नांत दिसणाऱ्या काही गोष्टींना महत्त्व आहे. स्वप्नशास्त्रानुसार दिवाळीपूर्वी दिसणारी काही स्वप्ने खूप शुभ मानली जातात. दिवाळी हा प्रकाशाचा सण असून देवी लक्ष्मीच्या पूजा आणि समृद्धीचा सण मानला जातो. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला दिवाळीचा सण साजरा केला जातो. यंदा ही तिथी 20 ऑक्टोबर रोजी येते. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी देवी लक्ष्मी फक्त ज्या घरामध्ये प्रवेश करते ज्या घरामध्ये स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा असते. स्वप्नशास्त्रानुसार, जर देवी लक्ष्मी एखाद्यावर प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीला स्वप्नांद्वारे शुभ अशुभ संकेत मिळतात. दिवाळीपूर्वी कोणते स्वप्न पाहणे शुभ असते, जाणून घ्या
स्वप्नशास्त्रानुसार, दिवाळीपूर्वी स्वप्नात स्वस्तिक, ओम किंवा शंख अशा गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. स्वप्नात या गोष्टी दिसणे म्हणजे देवी लक्ष्मी तुमच्या घरात आहे आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.
दिवाळीपूर्वी स्वप्नात कमळाचे फूल दिसणे हे खूप शुभ मानले जाते. स्वप्नामध्ये कमळाचे फूल दिसण्याचा अर्थ असा होतो की, कौटुंबिक जीवनामध्ये आनंद, संपत्ती आणि शांती भरलेली राहील. त्यासोबतच तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहील. तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
दिवाळीपूर्वी स्वप्नात मंदिर दिसले किंवा तुम्ही स्वतःला मंदिरात प्रवेश करताना पाहत असण्याचा अर्थ असा होतो की, तुमचे अपूर्ण काम पूर्ण होणार आहे. हे स्वप्न प्रगती आणि सकारात्मकतेचे देखील प्रतीक आहे.
हिंदू धर्मात गाईला समृद्धी आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे दिवाळीपूर्वी स्वप्नामध्ये गाईचे दूध किंवा गाय दिसणे हे खूप शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार, या गोष्टी स्वप्नात दिसणे म्हणजे आर्थिक लाभ होण्याची संकेत असू शकतात. स्वप्नात गाय पाहिल्याने अनेक गोष्टींमध्ये यश मिळण्यास मदत होते.
दिवाळीपूर्वी स्वप्नात दिवा किंवा शाश्वत ज्योत जळताना दिसणे खूप शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद आहे. ज्यामुळे तुमच्या जीवनात स्थिरता, शांती आणि दीर्घायुष्य येईल. तुमच्या संकटे लवकरच दूर होतील.
दिवाळीपूर्वी स्वप्नात सोने दिसणे खूप शुभ मानले जाते. स्वप्नामध्ये सोने दिसण्याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला भविष्यामध्ये संपत्ती मिळू शकते. तसेच तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारु शकते. तुमच्या सर्व समस्या सुटतील आणि तुम्हाला पैसे मिळतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)