फोटो सौजन्य- pinterest
होळी आणि दिवाळीप्रमाणेच गणेश चतुर्थीला खूप महत्त्व आहे. यावेळी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. गणेश चतुर्थीची सुरुवात बुधवार, 27 ऑगस्टपासून होत आहे. हा उत्सव 10 दिवस चालणार आहे. गणेश चतुर्थीचा सण गणपती बाप्पांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी काही उपाय केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, असे म्हटले जाते. गणेश चतुर्थीला कोणते उपाय करायचे, जाणून घ्या
पंचांगानुसार, भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथीची सुरुवात मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1.54 वाजता सुरु होणार आहे आणि या तिथीची समाप्ती बुधवार, 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3.44 वाजता होईल. यावेळी गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट रोजी आहे.
गणपती बाप्पाच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 11.5 ते 1.40 वाजेपर्यंत राहील. याला विघ्नांचा नाश करणाऱ्या गणपतीची स्थापना आणि पूजा विधीनुसार केली जाणार आहे. या दिवशी ब्रम्ह मुहूर्त पहाटे 4.28 ते 5.12 पर्यंत राहील. तर या दिवशी अभिजित मुहूर्त असणार नाही. चतुर्थीचा निशिता मुहूर्त सकाळी 12:00 ते 12:45 पर्यंत राहील.
जर तुमच्या जीवनामध्ये वारंवार अडचणी येत असतील तर चतुर्थीला योग्य पद्धतीने गणपतीची पूजा करा. त्यानंतर मोदक आणि इतर वस्तूंचा नैवेद्य दाखवा. दरम्यान, सुख आणि शांती प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करा. असे केल्याने सर्व समस्या दूर होतात, असे मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, आर्थिक संकटातून सुटका करुन घेण्यासाठी गणेश चतुर्थीच्या पूजेदरम्यान कर्जहर्ता गणेश स्तोत्राचे पठण करावे त्यानंतर गरिबांना दान करावे. असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि आर्थिक लाभाची शक्यता देखील निर्माण होते.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या ईशान्य दिशेला दिवा लावल्याने व्यक्तीला जीवनात शुभ परिणाम मिळतात. तसेच घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्याचसोबत घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास होतो. कुटुंबातील सदस्यांवर आशीर्वाद देखील राहतो.
जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या आनंदावर कधीही वाईट नजर लागू नये असे वात असल्यास चतुर्थीच्या दिवशी गणेशासमोर शेणाच्या पेंडीवर 2 कापूर आणि 6 लवंगा अर्पण कराव्यात. त्यानंतर त्याची राख मुलांच्या कपाळावर लावावी.
ज्या लोकांना घरात वारंवार समस्यांचा सामना करावा लागत आहे अशा लोकांनी गणेश चतुर्थीच्या बाप्पाची मनोभावे पूजा करावी. तसेच गुळांचा नैवेद्य दाखवावा. पूजा झाल्यानंतर गाईची सेवा करुन तिला गूळ खाऊ घालावा. असे केल्याने तुम्हाला पुण्य मिळेल आणि घरामध्ये सुरु असलेल्या समस्या हळूहळू दूर व्हायला लागतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)