फोटो सौजन्य- pinterest
सूर्य हा सन्मान, नेतृत्व, प्रशासन आणि उर्जेचे प्रतीक मानला जातो. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य आणि बुध चांगल्या स्थितीत असतात अशा लोकांना त्यांच्या या युतीचा चांगला फायदा होतो.
बुध ग्रह म्हणजेच ग्रहांचा राजकुमार लवकरच आपल्या राशीमध्ये बदल करणार आहे. आता तो कर्क राशीमध्ये असून शनिवार, 30 ऑगस्ट रोजी सिंह राशीमध्ये आपले संक्रमण करणार आहे. यावेळी बुध ग्रह संध्याकाळी 4.39 वाजता सिंह राशीमध्ये प्रवेश करेल. सिंह रास ही सूर्याची रास मानली जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य आणि बुध यांच्यात मैत्रीची भावना असल्याचे मानले जाते. आदराचा कारक असलेला सूर्य सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. बुधाच्या या संक्रमणामुळे बुधादित्य योग तयार होईल. ज्यामुळे काही राशीच्या लोकांना व्यवसाय, पद, प्रतिष्ठा, संपत्ती आणि करिअरमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. बुधादित्य योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार ते जाणून घ्या
बुधादित्य योगाचा फायदा वृषभ राशीच्या लोकांना होणार आहे. नातेवाईकांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतात. त्यासोबतच तुम्हाला व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. मित्रांसोबत तुमची मैत्री घट्ट होऊ शकते. गुंतवणुकीसाठी हा काळ खूप चांगला राहील. नोकरी करणाऱ्यांना उत्पन्न वाढ आणि पदोन्नतीच्या संधी मिळतील. घरात, समाजात आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांमध्ये एक चांगली प्रतिमा निर्माण होईल.
बुधादित्य योग कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या नातेसंबंधांमध्ये सुसंवाद वाढेल. तसेच तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांकडे तुम्ही आकर्षित व्हाल. या काळात विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. तसेच नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी मिळतील. न्यायालयात प्रलंबित असलेले जुने प्रकरण निकाली निघू शकतात. समाजामध्ये तुमचा मान सन्मान आणि आदर वाढेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर राहील. या काळात तुम्हाला पुढे जाण्याच्या संधी मिळतील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकते. चांगल्या निर्णय क्षमतेचा तुम्हाला फायदा होईल. करिअरमध्ये सकारात्मक बदल होतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील. जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे अशा लोकांना चांगली बातमी मिळू शकते. त्यासोबतच तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)