फोटो सौजन्य- istock
गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवावला सुरूवात होईल. यावर्षी तुम्हीही गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करत असाल तर वास्तूचे नियम नक्की लक्षात ठेवा.
गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झालेली आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून सलग 10 दिवस गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावेळी घरातील घरच्या मंदिरात किंवा पूजा मंडपात गणपतीची मूर्ती बसवली जाते आणि विधीनुसार त्याची पूजा केली जाते. द्रिक पंचांगानुसार, यावर्षी 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु होईल. या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. तसेच 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती विसर्जनासोबतच गणेशोत्सव संपेल. गणेश चतुर्थीनिमित्त देशभरात आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रात या उत्सवाचे विशेष वैभव दिसून येते. गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरे आणि मंडप सजले आहेत. वास्तूनुसार, गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात. गणेशजींच्या मूर्तीशी संबंधित वास्तू टिप्स जाणून घेऊया.
हेदेखील वाचा- लिव्हिंग रूमच्या सौंदर्यात भर टाकेल तुमचे टीव्ही युनिट, पाहा ट्रेंडिंग डिझाईन
गणेशजींच्या मूर्तीशी संबंधित वास्तू टिप्स
वास्तुशास्त्रानुसार, हिरवी गणेशमूर्ती उत्तर दिशेला बसवल्यास पैशासंबंधीच्या समस्या दूर होतात.
काळ्या रंगाची गणेशमूर्ती उत्तर- पूर्व दिशेला ठेवली पाहिजे. वास्तूनुसार, असे केल्याने मानसिक तणाव आणि रोग दोषांपासून मुक्ती मिळते.
केशरी रंगाचा गणपती बाप्पा दक्षिण किंवा आग्नेय दिशेला ठेवा. असे मानले जाते की, यामुळे आत्मविश्वास वाढतो.
हेदेखील वाचा- तुम्हाला सामान्य बाथरुमला लक्झरी लुक द्यायचा असेल तर या टिप्स वापरुन बघा
जीवनात सुख, शांती आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी पांढऱ्या रंगाची गणेशमूर्ती घरी आणू शकता. या रंगाचा गणपती उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावा.
वास्तू तज्ज्ञांच्या मते, घरातील मंदिर, स्वयंपाकघर आणि कार्यालयात वास्तू दोष दूर करण्यासाठी श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे शुभ असते.
वास्तूशास्त्रानुसार, घरात गणपतीच्या जास्त मूर्ती ठेवू नयेत.
घरामध्ये डाव्या सोंडेने गणपतीची मूर्ती बसवणे फायदेशीर मानले जाते.
घरामध्ये गणपतीची मूर्ती ठेवण्यासाठी मूर्तीची उंची 6 इंचांपेक्षा जास्त नसावी.
गणेश मूर्ती घरी आणताना काय करावे
श्रीगणेशाची मूर्ती आणण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावे. गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणण्याची प्रथा आहे. गणपती घरी आणताना त्या जागेवर अक्षता, गुलाल वाहून गणपती घरी आणावा. कारण अक्षता या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत. श्रीगणेशाची स्थापना ईशान्य दिशेला करावी.