फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र ग्रंथ म्हणून गरुड पुराणाला ओळखले जाते. ज्यामध्ये भगवान विष्णू आणि गरुड यांच्यातील संवादाचे वर्णन केले आढळते. या ग्रंथात जीवन, मृत्यू, धर्म, कर्म, पुनर्जन्म आणि मोक्ष यांच्याशी संबंधित ज्ञानाबद्दल सांगण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे गरुड पुराणात स्त्री आणि पुरुष दोघांचीही कर्तव्ये आणि धार्मिक नियमांचा उल्लेख आहे. यासोबतच जीवनाच्या प्रतिष्ठेशी आणि सामाजिक संतुलनाशी संबंधित गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. गरुड पुराणात महिला आणि पुरुषांसाठी कोणते नियम आणि कर्तव्ये सांगण्यात आली आहेत, जाणून घ्या
गरुड पुराणात म्हटल्याप्रमाणे पुरुषाने सत्यवादी, संयमी आणि धार्मिक असले पाहिजे. तसेच त्याने आपल्या पालकांची, गुरुंची आणि पत्नीची सेवा केली पाहिजे. त्यासोबतच त्यांनी जीवनामध्ये दान, तप आणि जप यासारखी चांगली कामे करण्यात घालवावीत. अहंकार, क्रोध, लोभ आणि आसक्ती यासारख्या दुर्गुणांपासून दूर राहावे.
गरुड पुराणामध्ये पुरुषांसाठी ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास अशा 4 आश्रमांचा उल्लेख आहे. यासोबतच, या आश्रमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचेही म्हटले आहे. असेही देखील म्हटले आहे की, जो माणूस पाप करतो, स्त्रियांचा अपमान करतो आणि सतत पापकर्म करतो अशा व्यक्तीला यमलोकात भयंकर यातना भोगाव्या लागतात.
पुरुषांप्रमाणेच महिलांसाठी देखील गरुड पुराणात अनेक नियम सांगण्यात आलेले आहे. असे म्हटले आहे की, स्त्रीने धर्माचे पालन करावे. तसेच तिने पतीच्या सेवेसोबतच जीवन जगले पाहिजे. त्यासोबतच सासू सासऱ्यांचा आदर करावा. घरकामात पारंगत राहावे. स्त्रीचे चारित्र्य हे तिचे सर्वात मोठे रत्न आहे, म्हणून तिच्यात नम्रता असली पाहिजे.
गरुड पुराणात महिलांबाबात असे देखील सांगण्यात येत की, जी स्त्री आपल्या पतीप्रती निष्ठावान, धार्मिक आणि नम्र असते तिला मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होते. जी स्त्री कपट किंवा चुकीचे आचरण करणाऱ्या स्त्रीला यमलोकात दुःख सहन करावे लागते.
गरुड पुराणामध्ये पुरुष आणि महिला दोघांसाठी वेगवेगळे नियम, कर्तव्ये आणि मर्यादा विहित करण्यात आलेले आहेत. हे नियम धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले गेल्यास सामाजिक व्यवस्थेसाठी आणि कौटुंबिक सुख आणि शांतीसाठी महत्त्वाचे आहेत.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)