
फोटो सौजन्य- pinterest
रत्नशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील आनंद, समृद्धी आणि यश हे त्याच्या कुंडलीमधील ग्रहांच्या हालचालींवर अवलंबून असते. ज्यावेळी ग्रह अशुभ स्थितीत असतो यावेळी खूप मेहनत घेऊनही यश मिळत नाही. पैसा येणे थांबते आणि मनात अस्वस्थता राहते. अशा वेळी योग्य रत्नाची निवड करणे आणि ते परिधान केल्याने व्यक्तीचे नशीब बदलू शकते. रत्नशास्त्रामध्ये पायराइट स्टोन ज्याला ‘यश आणि संपत्तीचे रत्न’ म्हटले जाते. पायराइट रत्न परिधान करण्याचे फायदे काय आहेत ते जाणून घ्या
रत्नशास्त्रानुसार, पायराइट हा सूर्याचा रत्न मानला जातो. सूर्य ऊर्जा, आत्मविश्वास आणि यशाचे प्रतीक आहे. जी व्यक्ती हे रत्न धारण करते त्या व्यक्तीमध्ये सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढतो. या रत्नांचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महागड्या रत्नांइतके मौल्यवान नाही, तरीही त्याचे परिणाम उल्लेखनीय मानले जातात. ते जीवनातील अंधार दूर करते आणि प्रकाश आणि आत्मविश्वास आणते.
पायराइटला ‘मनी स्टोन’ असेही म्हणतात कारण त्यात संपत्ती आकर्षित करण्याची क्षमता असते. असे मानले जाते की ज्यांना आर्थिक समस्या, गुंतवणुकीत नुकसान त्याचप्रमाणे नोकरी किंवा व्यवसायात अडथळे येत असणाऱ्या लोकांसाठी हे रत्न प्रभावी ठरते. हे रत्न परिधान केल्याने माणसामधील निर्णय घेण्याची क्षमता वाढते, त्याला संधी ओळखण्याची बुद्धी मिळते आणि मेहनतीचे फळ वेळेवर मिळू लागते.
ज्योतिषशास्त्रानुसार, पायराइट परिधान केल्याने आत्मविश्वास, धैर्य आणि ऊर्जा निर्माण होते. हे रत्न मानसिक ताण कमी करते आणि नकारात्मक विचार दूर करते. ज्यावेळी मन शांत राहते त्यावेळी यश स्वाभाविकपणे मिळते. हे रत्न जीवनात नवीन संधी मिळून देतात.
जी व्यक्ती बऱ्याच काळापासून कर्जात किंवा आर्थिक अडचणीत असेल त्या व्यक्तींनी पायराइट वापरणे फायदेशीर मानले जाते. कर्ज फेडण्याची तुमची क्षमता हळूहळू सुधारते आणि तुमचे आर्थिक संतुलन सुधारते. हे रत्न तुमच्या पर्समध्ये किंवा ऑफिसच्या तिजोरीत ठेवल्याने पैशाचा प्रवाह वाढतो आणि आर्थिक अडथळे दूर होतात.
हे रत्न व्यावसायिकांसाठी खूप फायदेशीर आहे. काही कारणास्तव त्यांना वारंवार तोटा होत असल्यास किंवा व्यवहार यशस्वी होत नसल्यास हे रत्न परिधान करणे खूप शुभ मानले जाते. कार्यालयात किंवा दुकानात पायराइट ठेवता येईल. हे केवळ संपत्ती वाढविण्यास मदत करत नाही तर आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची शक्ती देखील वाढवते.
कोणत्याही सोमवार किंवा रविवारी पायराइट स्वच्छ करा ते सूर्याच्या दिशेने ठेवा आणि त्याची पूजा करा. नंतर ते तुमच्या उजव्या हाताला घाला किंवा तिजोरीत ठेवा. लक्षात ठेवा की ते परिधान करण्यापूर्वी एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घेणे गरजेचे आहे. त्याचा तुम्हाला शुभ परिणाम मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: पायराइटला सोन्यासारखे दिसणारे धातूरत्न म्हटले जाते. हे एक नेैसर्गिक क्रिस्टल आहे
Ans: पायराइट रत्न परिधान केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि संपत्ती आकर्षित करते.
Ans: व्यवसाय आणि नोकरीमध्ये अडथळे येणाऱ्या लोकांनी, कर्ज आणि आर्थिक तणाव असलेल्या लोकांनी हे रत्न परिधान करावे