
फोटो सौजन्य- pinterest
अशी काही रत्ने आहेत ते तुमची आर्थिक स्थिती बदलण्यास मदत करतात. ज्योतिष आणि रत्नशास्त्रानुसार, अशी रत्ने आहेत जी तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढवू शकतात.
प्रत्येकाला आपल्या कष्टाचे फळ लवकर हवे असते. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. बऱ्याचदा काही लोक खूप मेहनत घेऊन सुद्धा त्यांना अपेक्षित ते फळ मिळत नाही. मात्र अशी काही रत्ने आहेत तुमच्या संपत्तीचा आणि यशाचा मार्ग मोकळा करू शकतो. रत्नशास्त्रामध्ये अनेक रत्नांचे वर्णन केलेले आहे. अशी रत्ने आहेत जे ग्रहांच्या हालचालीनुसार फायदेशीर ठरतात. आर्थिक यशाची हमी देणारे असे तीन रत्न आहेत, कोणती आहेत ती रत्ने जाणून घ्या
वाघाचे रत्न किंवा वाघाचे डोळे हे आर्थिक समस्या सोडवणारे रत्न मानले जाते. ते त्याच्या आकर्षक पिवळ्या-तपकिरी रंगासाठी आणि काळ्या पट्टेदार नमुन्यासाठी ओळखले जाते. या रंगांची रत्ने परिधान केल्याने आर्थिक निर्णयांमध्ये स्पष्टता येते आणि आर्थिक संकट कमी होते. हे रत्न परिधान केल्याने व्यवसाय आणि गुंतवणूकीमध्ये विवेकबुद्धी वाढवते. तसेच आत्मविश्वास आणि मानसिक स्थिरता देखील वाढवते. हे रत्न अंगठी किंवा लॉकेटमध्ये घालणे चांगले चांगले मानले जाते.
हिरा हे शुक्र ग्रहाचे रत्न आहे. ज्याचा संबंध संपत्ती आणि भौतिक सुखाशी आहे. शतकानुशतके ते संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. हे रत्न केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून ते परिधान केल्याने व्यक्तीच्या कुंडलीमधील शुक्र ग्रहाची स्थिती देखील मजबूत होते. तसेच तो प्रेम, संपत्ती आणि विलासिता या बाबतीत मदत करतो. हिरा रत्न धारण केल्याने व्यक्तीला अनेक फायदे होतात. संपत्ती आणि व्यवसाय वाढतो. तसेच सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्त्वात चमक येते. हिऱ्याची अंगठी ही शुक्रवारी परिधान करणे शुभ मानले जाते. पांढऱ्या सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा हिरा वापरणे सर्वांत प्रभावी मानले जाते.
पिवळा पुष्कराज हा गुरु ग्रहाचा रत्न मानला जातो. तो धारण केल्याने आर्थिक समस्या कमी होतात आणि बुद्धिमत्ता सुधारते. याला पिवळा नीलम असे देखील म्हटले जाते. पुष्कराज रत्न परिधान केल्याने गुंतवणूक आणि व्यवसायात प्रचंड यश मिळवून देते, तसेच शिक्षण आणि करिअरमध्येही फायदे देते. हे रत्न तर्जनी बोटात परिधान केले जाते. नेहमी शुद्ध आणि नैसर्गिक पुष्कराज निवडावा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)