फोटो सौजन्य- pinterest
ऑक्टोबर महिन्यामध्ये ग्रह नक्षत्रांच्या संयोग होणार आहे. ज्याचा फायदा कुंभ राशीसह या राशीच्या लोकांना होणार आहे. या महिन्यात एक किंवा दोन नाही तर पाच ग्रह आपली राशी बदलणार आहे. या महिन्यात बुध, सूर्य, गुरु, शुक्र आणि मंगळ हे ग्रह आपल्या राशीमध्ये बदल करणार आहे. शनि मीन राशीमध्ये वक्री होत असल्याने त्यांच्या राशी आणि नक्षत्रांमध्ये देखील बदल होणार आहे. गुरु आणि शुक्र ग्रहांसोबत ग्रहांचे होणारे संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, जाणून घ्या
सर्वात पहिले ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी बुध कन्या राशीमध्ये संक्रमण करणार आहे. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी तूळ राशीमध्ये संक्रमण करेल. त्यासोबतच 24 ऑक्टोबर रोजी बुध तूळ राशीतून बाहेर पडेल आणि वृश्चिक राशीत संक्रमण करेल. यानंतर बुध कन्या राशीमध्ये प्रवेश करेल. 17 ऑक्टोबर रोजी ग्रहांचा राजा सूर्य तूळ राशीमध्ये प्रवेश करेल, जिथे बुध सूर्याशी युती करेल. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी गुरु कर्क राशीतून अधिक्रमण करेल. महिन्याच्या शेवटी मंगळ बुधाशी युती करेल.
मेष राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा महिना खूप फायदेशीर राहणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. बऱ्याच काळापासन तुम्हाला घर किंवा वाहन खरेदी करायचे असल्यास या काळात तुमची इच्छा पूर्ण होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीच्या नवीन संधी मिळतील. तसेच नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना या महिन्यात चांगली नोकरी मिळेल.
वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा महिना खूप फायदेशीर राहणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रत्येक पावलावर पाठिंबा मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती पाहून आनंद होईल. यावेळी आर्थिक अडचणी दूर होतील. आत्मविश्वास आणि उत्पन्नही वाढेल.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ राहणार आहे. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होईल. तसेच व्यवसायाच्या नवीन संधी मिळतील. या काळात तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला असणार आहे. कुटुंबामध्ये शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप फायदेशीर राहणार आहे. या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तसेच तुमचे आरोग्य देखील चांगले राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. या लोकांना आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. या काळात तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ देखील घालवू शकता. समाजात तुमचा आदर आणि कीर्ती वाढेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप भाग्यशाली राहणार आहे. या महिन्यात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. तुम्ही केलेल्या प्रयत्नात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. न्यायालयीन प्रकरणामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर या महिन्यात तुम्हाला ते परत मिळतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)