
फोटो सौजन्य- pinterest
शुक्रवार, 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.34 वाजता सूर्य आणि चंद्राच्या युतीमुळे व्यतिपात योग तयार होत आहे. ही ज्योतिषशास्त्रामध्ये महत्त्वाची खगोलशास्त्रीय घटना मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग केवळ सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत नाही तर आत्मनिरीक्षण, संतुलन आणि सुधारणा यासाठी एक शुभ संधी असल्याचे देखील मानले जाते. या काळामध्ये तुमचे विचार स्थिर करण्याचे अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आणि नवीन दिशा शोधण्याचा हा योग संकेत देणारा असल्याचे मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार या योगाचा प्रभाव काही राशीच्या लोकांवर असल्याचे दिसून येईल. मात्र काही राशीच्या लोकांसाठी हा योग योग्य दृष्टिकोन, संयम आणि सकारात्मक कृतींसह या कालावधीला आध्यात्मिक वाढ, आर्थिक सुधारणा आणि मानसिक शांतीच्या काळात बदलू शकतो. व्यतिपात योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या
व्यतिपात योगाचा मिथुन राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. दीर्घकाळ रखडलेली कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि रखडलेले व्यवहार मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात तुमचे आरोग्य देखील चांगले राहतील. दीर्घकालीन आजारांपासून आराम मिळेल. तसेच कुटुंबामधून तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. या काळात तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा आणि देवी लक्ष्मीची पूजा करा त्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. हा उपाय करणे फायदेशीर ठरतो.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ स्व-विकास आणि मानसिक शांतीचा असणार आहे. व्यतिपात योग तुमच्या जीवनाची दिशा पुन्हा विचारात घेण्याची संधी देत आहे. या काळामध्ये करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. या काळातु तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तुमचे आरोग्य सुधारेल, विशेषतः मानसिक ताणतणाव कमी झाल्याने. कुटुंब आणि नातेसंबंध अधिक सुसंवादी होतील. या योगामध्ये चंद्राला जल अर्पण करणे आणि पांढरे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते.
वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये या काळामध्ये नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल. ग्रहांची स्थिती ही या राशीच्या लोकांच्या बाजूने राहील. तुमची प्रलंबित कामे या काळात पूर्ण होतील. कामावर पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ किंवा नवीन करारांमुळे फायदा होईल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिले गेल्यास हा काळ आरामदायी राहू शकेल. तसेच तुमच्यामधील जुना थकवा दूर होईल आणि मनात सकारात्मकता वाढेल. एखाद्या सहलीमुळे चांगली बातमी येऊ शकते. तुमचा अध्यात्माकडे कल वाढेल. व्यतिपात योगामध्ये महादेवांची पूजा करणे खूप फायदेशीर राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)