फोटो सौजन्य- pinterest
बुधवार, 16 जुलै रोजी सूर्य कर्क राशीमध्ये संध्याकाळी 5.17 वाजता आपले संक्रमण करणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याचे हे संक्रमण महत्त्वाचे मानले जाणार आहे. सूर्य आणि चंद्र यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहे. सूर्याच्या संक्रमणाचा खूप शुभ राहणार आहे. सूर्याला आत्मा, मान, पिता इत्यादींचा कारक आणि नेतृत्व गुण दर्शविणारा ग्रह मानले जाते. सूर्य आपल्या मित्र राशी कर्क राशीत बसलेला असल्याने कर्क, सिंह आणि कन्या राशीसह या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना पैसे कमविण्याची संधी देखील मिळते. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या
सूर्याचे संक्रमण कर्क राशीत होत असल्याने हे संक्रमण शुभ राहणार आहे. या काळामध्ये कर्क राशीच्या आर्थिक स्थिती चांगली राहील. काही लोकांना नवीन संधी मिळतील. ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पैसे कमविण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होतील. तसेच जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना यश मिळेल. उत्पन्नाचे स्त्रोत मिळतील.
सूर्याचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. या काळात नोकरी करणारे लोक परदेश प्रवास करू शकतात. तुम्हाला कोणत्याही कामानिमित्त बाहेर जावे लागू शकते. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही मित्र परिवारासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता. तसेच जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील.
सूर्याचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. या काळामध्ये तुमची प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. व्यावसायिक जीवनावर चांगला परिणाम होताना दिसून येईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर राहील. तसेच तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला चांगला फायदा होईल. जर तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला खूप फायदा होईल.
तूळ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण अनुकूल असेल. या लोकांचे वैयक्तिक संबंध चांगले राहील. तसेच या लोकांना वैयक्तिक जीवनामध्ये यश मिळेल. खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांना पगारवाढ होऊ शकते. व्यवसायामध्ये एकामागून एक अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते. समाजामध्ये तुमची एक वेगळी ओळख तयार होईल. कुटुंबामध्ये असलेले मतभेद दूर होतील.
सूर्याचे हे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सामान्य असेल. या काळात तुम्ही नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला कौटुंबिक संबंधांकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना अचानक लाभ होऊ शकतो. जर तुमचे काम सरकारी क्षेत्र आणि प्रवास उद्योगाशी संबंधित असेल तर तुम्हाला यश मिळेल. हे लोक कुटुंबासोबत अधिक वेळ घालवतील. तसेच धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतील. सरकारी क्षेत्रातून लाभ मिळू शकतात. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)