फोटो सौजन्य- pinterest
आषाढ महिन्यात गुप्त नवरात्रीची सुरुवात 26 जूनपासून झालेली आहे. यावेळी आपण अशा काही गोष्टींची खरेदी केल्यास देवी प्रसन्न होते आणि आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. कोणत्या गोष्टी आहेत त्या जाणून घ्या
आषाढ महिन्यामधील गुप्त नवरात्रीची सुरुवात 26 जूनपासून झालेली आहे. आज रविवार, 29 जून गुप्त नवरात्रीचा चौथा दिवस. नवरात्रीच्या काळात देवीची पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते. यावेळी देवीच्या 9 रुपाची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, देवीच्या 9 रुपाची पूजा करुन काही नियम पाळल्यास व्यक्तीला जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात. वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टींबद्दल सांगितले आहे की, प्रत्येक दिवसाला एखाद्या विशिष्ट देवतेला ते समर्पित आहे. नवरात्रीमध्ये या गोष्टी घरात आणल्याने देवी प्रसन्न होऊन भक्ताला आशीर्वाद देते आणि त्या भक्ताच्या परिवारामध्ये नेहमी सुख समृद्धी नांदते. गुप्त नवरात्रीमध्ये घरात कोणत्या वस्तू आणायच्या, जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार, कमळाचे फूल देवी लक्ष्मीला खूप आवडते. नवरात्रीमध्ये कमळाचे फूल किंवा त्यासंबंधित कोणतेही चित्र आणल्यास घरातील वातावरण प्रसन्न राहते. त्यासोबतच देवी लक्ष्मीचा आपल्या परिवारावर आशीर्वाद देखील राहतो, असे मानले जाते. त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते.
नवरात्रीमध्ये घरात सोन्याचे किंवा चांदीचे नाणे आणणे खूप शुभ मानले जाते. त्या नाण्यांवर देवी लक्ष्मी किंवा गणपती बाप्पाचे चिन्ह असणे खूप शुभ मानले जाते.
देवी लक्ष्मी कमळाच्या फुलांवर बसलेली असल्याचा फोटो नवरात्रीमध्ये घरी आणावा असे केल्याने घरामध्ये संपत्ती आणि समृद्धी कायम टिकून राहते. असे म्हटले जाते की, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारते.
देवी सरस्वतीचे वाहन मोर आहे. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसात घरी मोरपंख आणून ते देव्हाऱ्यात ठेवल्यास आपल्यावा अनेक फायदे होतात. तसेच मोरपंख हे मुलांच्या खोलीमध्ये ठेवल्यास त्यांना शिक्षणात यश मिळते, त्यांची चांगली प्रगती होते. यामुळे देवी प्रसन्न होते, असे म्हटले जाते.
नवरात्रीच्या दिवसामध्ये सोळा श्रृंगाराच्या वस्तू घरी आणून देव्हाऱ्यात ठेवाव्यात यामुळे देवी प्रसन्न होते आणि तिचा कायम आपल्या परिवारावर आशीर्वाद राहतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)