फोटो सौजन्य- pinterest
वास्तुशास्त्रानुसार, घराची रचना, दिशा आणि उर्जेचा आपल्या आरोग्यावर परिणाम होताना दिसून येतो. जर घरामध्ये वास्तूदोष आणि नकारात्मक ऊर्जा असल्यास व्यक्ती सतत आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. वास्तूच्या कोणत्या नियमांचे पालन केल्याने आपले आरोग्य सुधारु शकते, जाणून घ्या
वास्तुशास्त्रात म्हटल्याप्रमाणे दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोक करुन झोपावे. असे म्हटले जाते की, उत्तर दिशेला डोक करुन झोपल्याने रक्ताभिसरणात अडथळा येतो आणि वारंवार डोकेदुखी, थकवा किंवा निद्रानाश यांसारख्या समस्या उद्भवतात. झोपताना दिशेची योग्य ती काळजी घेतल्यास आरोग्य चांगले राहते.
जर तुमच्या पलंगाखाली रिकामी जागा असेल आणि तुम्ही त्याच्या खाली चप्पल, बूट, जुने कपडे किंवा जुन कागदपत्रे, रद्दी यांसारख्या काही गोष्टी ठेवत असल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. यामुळे मानसिक ताण, थकवा आणि झोपेचा अभाव यांसारख्या समस्या येतात.
जर आपण झोपलेल्या ठिकाणी समोर आरसा असल्यास आपले शरीर त्यामधून प्रतिबिंबित होत असते. त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी मानसिक शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे तुमच्या समोर आरसा असल्यास तो झोपण्याआधी कपड्याने झाकून ठेवा.
जर तुमच्या घरात सकाळी सूर्यप्रकाश येत असल्यास ते चांगले आहे त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तसेच तुम्हाला रोगांचा सामना करण्यासाठी शक्ती वाढते. सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी देखील आपल्या शरीराला मिळते. व्हिटॅमिन डी हे हाडांसाठी अत्यंत आवश्यक आहे.
घरामधील ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा. या कोपऱ्याला देवाचे स्थान मानले जाते. या ठिकाणी घाण किंवा जड वस्तू ठेवल्याने मानसिक अशांतता, थकवा आणि आजार वाढतात.
घरामध्ये पाण्याची असलेली टाकी किंवा बोअरिंग या गोष्टी उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला असणे गरजेचे मानले जाते. पाण्याची किंवा बोअरिंग चुकीच्या दिशेला लावल्यास तुमच्यावर एखाद्या गोष्टीचा ताण येणे किंवा आजार निर्माण होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
तुमच्या घरामधील स्वयंपाकघर आणि बाथरूम एकमेकांसमोर असल्यास ते पाणी आणि अग्नी या घटकांमधील संघर्ष दर्शवते. यामुळे परिवारातील सदस्यांमध्ये आजार आणि तणाव येतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)