फोटो सौजन्य- istock
देवतांचे गुरु बृहस्पति ज्यांना नवग्रहांमध्ये सर्वात महत्त्वाचे मानले जाते, ते आता त्यांच्या राशी परिवर्तन प्रक्रियेसाठी ओळखले जातात. प्रत्येक वेळी जेव्हा गुरु ग्रह राशी बदलतो त्यावेळी त्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे होताना दिसून येतो. मे महिन्यामध्ये गुरु ग्रहाने मिथुन राशीमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे त्याचे अतिक्रमण अतिवेगाने होत आहे. मात्र आता तो ऑक्टोबर महिन्यामध्ये कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तिथे तो 49 दिवस राहील. नंतर परत तो मिथुन राशीमध्ये आपले परिवर्तन करेल. या संक्रमणामुळे त्याचा 12 राशीच्या लोकांवर विविध प्रकारे परिणाम होताना दिसून येतो. या संक्रमणाचा कोणत्या 3 राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रह 18 ऑक्टोबर रोजी रात्री 9.39 वाजता कर्क राशीत प्रवेश करेल आणि 5 डिसेंबर रोजी दुपारी 3.38 वाजता पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करेल. या काळात गुरु ग्रहाच्या होणाऱ्या हालचालीमुळे व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या अडचणी, आर्थिक वाढ आणि वैयक्तिक विकासात नवीन संधी इत्यादी गोष्टी दूर होण्यास मदत होईल. ग्रहांच्या होणाऱ्या या परिवर्तनामुळे अनेक मोठ्या बदलांना सामोरे जावे लागेल. गुरु ग्रहांच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
कर्क राशीत गुरूचा प्रवेश मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. गुरुचे संक्रमण या राशीमध्ये दुसऱ्या घरात होणार आहे. ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येतील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि उच्च अधिकाऱ्यांशी किंवा वरिष्ठ लोकांशी चांगले संबंध निर्माण होतील याचा तु्म्हाला भविष्यात फायदा होईल. तसेच या काळात तुमच्यावरील मानसिक ताण कमी होईल. या काळात तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करु शकता तो तुमच्यासाठी भविष्यात फायद्याचा ठरेल.
कर्क राशीत गुरूचा प्रवेश वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या तुमच्या इच्छा आणि कामे पूर्ण होतील. या काळात कौटुंबिक जीवनामध्ये आनंद राहील. तसेच मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्हाला एखादा खास मित्र किंवा जवळचा मित्र भेटू शकेल ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक आणि आनंदाचे क्षण घेऊन येणारा राहील.
गुरूचा कर्क राशीमध्ये प्रवेश मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणारा आहे. हा ग्रह मीन राशीमध्ये पाचव्या घरात संक्रमण करणार आहे. ज्यामुळे शिक्षण आणि मुलांशी संबंधित गोष्टींमध्ये तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. तसेच कुटुंबासोबत तुम्ही आनंदात वेळ घालवाल. शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या लोकांना विशेष यश मिळू शकते. जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. त्याचसोबतच तुम्हाला उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी उपलब्ध होतील. या काळात तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)