फोटो सौजन्य- istock
भारतीय परंपरेनुसार प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. जसे सोमवार हा शंकराचा वार आहे तसाच गुरुवारचा दिवस भगवान विष्णू, बृहस्पति, दत्त यांना समर्पित आहे. हा दिवस शुभ आणि सौभाग्याचा मानला जातो. मान्यतेनुसार गुरुवारी पिवळ्या रंगांचे कपडे परिधान केल्याने भगवान विष्णू यांचे आशीर्वाद मिळतात. तसेच जीवनामध्ये प्रगती होते, असे मानले जाते.
पिवळा रंग फक्त दिसायलाच सुंदर नाही तर त्याचा संबंध आपल्या विचारसरणी, वर्तन आणि जीवनाच्या अनेक पैलूंशी संबंधित असतो. पिवळ्या रंगांला ऊर्जा, आनंद आणि चांगल्या विचारांचे प्रतीक मानले जाते. धामिक श्रद्धेनुसार गुरुवारी पिवळ्या रंगांचे कपडे परिधान करणे ही फक्त श्रद्धाच नाही तर आपल्या जीवनावर देखील होणारा त्याचा परिणाम दिसून येतो.
धर्मामध्ये भगवान विष्णूंना रक्षक मानले जात असल्याने भक्तांना जीवनामध्ये संतुलन, आनंद आणि शांती प्रदान करतात, अशी मान्यता आहे. गुरुवारी पिवळ्या वस्तू परिधान करणे किंवा पिवळ्या वस्तूंचे गरिबांमध्ये दान करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की, असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होऊन भक्तांच्या कुटुंबामध्ये सुख समृद्धीचे वातावरण राहते.
जर गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगांचे कपडे परिधान केल्यास कुंडलीमधील ग्रहांचे स्थान मजबूत होते. ग्रहाचा संबंध करिअर, शिक्षण, नशीब आणि सामाजिक प्रतिष्ठा यांच्याशी असल्याने कुंडलीत ग्रहाची स्थिती कमकुवत असल्यास त्या दिवशी पिवळ्या रंगांचे कपडे परिधान करणे किंवा दान करणे फायदेशीर आहे.
पिवळा रंग हा हलका आणि शांतीचे प्रतीक मानला जातो. यामुळे व्यक्तीचे मन नकारात्मक विचारांपासून दूर राहते. तसेच या रंगांमुळे व्यक्तीच्या मनातील आत्मविश्वास वाढण्यास देखील मदत होते. ज्या लोकांना मानसिक ताण किंवा त्यांच्या मनात गोंधळ आहे त्या लोकांनी हा रंग परिधान करणे खूप फायदेशीर आहे.
असे मानले जाते की, पिवळा रंग परिधान केल्याने आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.
ज्या मुलांमुलीच्या लग्नामध्ये अडथळे येत आहे त्यांनी गुरुवारी पिवळ्या रंगांचे कपडे परिधान करुन केळीच्या झाडाची पूजा करावी.
पिवळा रंग विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधील एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)