
फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये गुरुवारचा दिवस हा भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांना समर्पित असल्याचे म्हटले जाते. यावेळी त्याची विधीवत पूजा करणे देखील महत्त्वाचे मानले जाते. शास्त्रानुसार गुरुवारी तुळशीच्या रोपाची पूजा करण्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. गुरुवारी तुळशीच्या संबंधित काही उपाय केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे. त्यासोबतच घरातील प्रत्येक सदस्यांवर त्यांचा आशीर्वाद राहतो असे म्हटले जाते. गुरुवारच्या दिवशी तुळशीचे कोणते उपाय केल्याने फायदे होतात ते जाणून घ्या
सकाळी लवकर उठून भगवान विष्णूंची विधीवत पूजा करावी. त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद आणि गंगाजल मिसळून ते तुळशीच्या रोपाला अर्पण करावे. दर गुरुवारी हा उपाय केल्याने तुमच्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतील आणि तुमची जीवनामध्ये प्रगती होईल. गुरुवारी तुळशीचा हा उपाय केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात.
सकाळी आणि संध्याकाळी भगवान विष्णूची पूजा करावी. संध्याकाळी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. दिवा लावून झाल्यानंतर ‘ओम श्रीं ह्रीं क्लीम श्रीं लक्ष्मी नारायणाय नमः’ या मंत्रांचा शक्य झाल्यास 108 वेळा जप करावा. हा उपाय केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात. तसेच घरामध्ये सुरु असलेले आर्थिक संकट देखील दूर होते.
सकाळी पूजा झाल्यानंतर तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे. तसेच ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. हा उपाय केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात. त्यासोबतच जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते.
तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायात वारंवार समस्या येत असल्यास गुरुवारी तुळशीचा हा उपाय करु शकता. संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावून त्या रोपाजवळ 5 किंवा 7 पिवळ्या कढई ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा झाल्यानंतर त्या उचलाव्या आणि लाल किंवा पिवळ्या कपडात बांधून पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. त्यामुळे तुमचे करिअर आणि व्यवसायामध्ये येणारे अडथळे दूर होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)