फोटो सौजन्य- pinterest
यंदा दिवाळीला एक शुभ योग तयार होत आहे. असा योग जवळजवळ 100 वर्षानंतर तयार होत आहे. हा योग काही राशीच्या जीवनात मोठे बदल घडवून आणणारा आहे. दिवाळीमध्ये गुरु ग्रह त्याच्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीमध्ये वक्री होणार आहे. ज्यामुळे हंस महापुरुष राजयोग तयार होईल. हा दुर्मिळ योग दिवाळीमध्ये म्हणजे 20 ऑक्टोबर रोजी तयार होईल. हंस महापुरुष राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी सौभाग्य, ज्ञान आणि समृद्धी घेऊन येतो. यावेळी कर्क राशीत गुरूची वक्री स्थिती हा प्रभाव आणखी शक्तिशाली बनवेल. या संयोगामुळे तूळ, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील. या राशींना दीर्घकालीन यश, करिअर वाढ आणि आर्थिक प्रगतीची चिन्हे दिसतील.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग खूप प्रभावशाली ठरणार आहे. या योगामुळे तुमच्यामधील आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व वाढेल. खूप मेहनत घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. सन्मान वाढेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. या काळामध्ये व्यावसायिकांना नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. तर अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात.
तूळ राशीच्या कुंडलीमध्ये हा योग दहाव्या घरामध्ये होत आहे. या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सामाजिक आदर वाढेल आणि त्यांच्या मतांना अधिक महत्त्व असेल. या काळात तुम्हाला व्यवसायामध्ये आर्थिक फायदा होईल. तसेच तुमचे रखडलेले व्यवहार पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुधारतील.
वृश्चिक राशीच्या कुंडलीमध्ये हा योग नवव्या घरामध्ये होत आहे. या काळात या राशीच्या लोकांचे नशीब चमकेल. या योगाचा प्रभाव तुमच्यावर जाणवेल. धार्मिक कार्यात रस वाढेल आणि लांब प्रवास शक्य होईल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे या काळात पूर्ण होतील. करिअरच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
100 वर्षानंतर तयार होणारा हा योग या तिन्ही राशींच्या जीवनामध्ये नवीन ऊर्जा आणि प्रगती घडवून आणेल. या काळात दान आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान केल्याने शुभ परिणाम अनेक पटीने वाढतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)