
फोटो सौजन्य - Social Media
आता तरी वेगळे असले तरी दोन्ही देशांचा खानपान, इतिहास तसेच संस्कृतीमध्ये काही फारसा बदल नाही आहे. दोन्ही देशांमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये देखील अनेक साम्य आढळून येतात. पाहिले गेले तर १९४७ च्या आधी दोन्ही देश हे एकच होते. त्यामुळे दोन्ही देशांतील अनेक गोष्टींमध्ये समानता दिसून येणे सामान्य गोष्ट आहे. मुळात भारतात हिंदू जनसंख्या मोठी आहे तर पाकिस्तानमध्ये इस्लाम धर्मियांची संख्या मोठी आहे. दोन्ही देशांमध्ये अगदी दोन्ही देशांच्या उगमापासून शत्रुता कायम राहिली आहे. याला अनेक बाबी कारणीभूत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे भारतातील बहुतेक हिंदू जनसंख्येला हा प्रश्न मात्र कायम असतो कि पाकिस्तान देशात हिंदू मंदिरांची संख्या नक्की किती आहे? जर तुम्हालाही असा प्रश्न आहे तर हे लेख अगदी शेवटपर्यत वाचा. या लेखामध्ये पाकिस्तानमध्ये किती मंदिर असल्यापासून त्या मागचा इतिहास अगदी संक्षिप्त रूपात नमूद आहे.
पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरांना निशाण्यावर धरण्याच्या बातम्या अनेकदा पाहायला मिळत असतात. महत्वाची बाब म्हणजे ज्या वेळी पाकिस्तान तयार झाला त्यावेळी तेथे मंदिरांची संख्या आजच्या तुलनेत जास्त होती. जसा काळ बदलत गेला तेथील मंदिरांची संख्या देखील घटत गेली. मंदिरांच्या संख्येतील या घटाला तेथील राजकीय मानसिकता जास्त कारणीभूत असल्याचे इतिहासात दिसून येते. सुरुवातीच्या काळात पाकिस्तानात एकूण ४२८ मंदिरे होती. या संख्येत घट होऊन, ही संख्या आता २२ वर येऊन थांबली आहे.
पाकिस्तानमधील ४०८ हिंदू मंदिरांना तेथील शासनाने हॉटेल, शाळा तसेच मदरस्यांचे रूप दिले आहे. पाकिस्तानच्या पख्तूनख्वा प्रांतातील हिंदू मंदिरांना पूर्णपणे नष्ट करण्यात आले आहे. या प्रांतात फक्त ३ मंदिरे शिल्लक आहेत. पाकिस्तानच्या सिंधमध्ये सर्वाधिक ११ मंदिरे आहेत. तर पंजाबमध्ये 4, पख्तूनख्वामध्ये 4 आणि बलुचिस्तानमध्ये 3 मंदिरे आहेत. २०२० मध्ये, पाकिस्तानात १३०० वर्षे जुने प्राचीन मंदिर सापडले होते. हे पुरातन मंदिर भगवान विष्णूचे असल्याचे सांगण्यात आले होते. पाकिस्तानात हिंदूंची लोकसंख्या ३८ लाख असून तेही भारतातील हिंदुप्रमाणे हिंदू सण उत्सव मोठ्या जल्लोषाने साजरे करतात.