Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची आर्थिक कोंडी! UAE ने दिला परतफेडीसाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम

पाकिस्तानच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पाकिस्तानला आर्थिक संकटात संयुक्त अरब अमिरातीने तब्बल २ अब्ज डॉलर्स कर्ज दिले होते. मात्र, आता UAE ने ३० दिवसांची परतफेडीची मुदत दिल्याने पाकिस्तान चिंतेत आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 06, 2026 | 02:54 PM
Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची आर्थिक कोंडी! UAE ने दिला परतफेडीसाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची आर्थिक कोंडी! UAE ने दिला परतफेडीसाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढ 
  • यूएईने दिले होते तब्बल २ अब्ज डॉलर्स कर्ज
  • यूएईने कठोर भूमिका घेत परतफेडीसाठी दिली ३० दिवसांची मुदत 
 

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. पाकिस्तानवर आर्थिक संकट ओढवले असताना संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) पाकिस्तानला २ अब्ज डॉलर्स कर्ज दिले होते, जे आता त्यांनी पुढील महिन्यात ६.५ टक्के व्याजदराने परत करण्याचे मान्य केले आहे. यूएईने प्रत्येकी १ अब्ज डॉलर्सचे दोन कर्ज दिले, जे १६ आणि २२ जानेवारीला पूर्ण झाले. मुदत आणि व्याजदरावर पुढील वाटाघाटींसाठी वेळ मिळावा म्हणून कर्ज एका महिन्यासाठी वाढविण्यात आले. तथापि, यूएईने कठोर भूमिका घेत आता पाकिस्तानला फक्त ३० दिवस दिले आहेत.

हे देखील वाचा: 8th Pay Commission Update: केंद्र कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार! जानेवारीपासून डीएमध्ये २% वाढ निश्चित?

पाकिस्तानकडून कर्जाच्या मुदतवाढीसाठी विनंती केली जात असून परतफेडीमुळे वित्तपुरवठा होणारी तफावत निर्माण होईल जी इतर स्रोतांकडून भरून काढावी लागेल असे त्याचे म्हणणे आहे. तसेच, पाकिस्तान सध्या अनेक संकटांनी वेढलेला आहे. अलिकडेच, आयएमएफनेही नकारात्मक आर्थिक वाढीची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे इतर दुसरे देश कर्ज देताना सावधगिरी बाळगत आहेत.

येमेनमधील गटांना पाठिंबा देण्यावरून सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील वादात पाकिस्तानने सौदी अरेबियाला पाठिंबा दिल्यामुळे युएईने पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतल्याचे म्हंटले जात आहे. पाकिस्तानला अचानक इतक्या मोठ्या रकमेची एकाच वेळी परतफेड करावी लागणे आणि तेही इतक्या कमी वेळेत, हे एक आव्हान असेल. कारण, सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांच्यासाठी ३० दिवसात एवढी मोठी रक्कम उभी करणे अवघड आहे.

हे देखील वाचा: IDBI Bank Privatization News: IDBI बँक कोणाच्या ताब्यात? फेअरफॅक्स आणि कोटक मैदानात 

कर्ज परतफेडीचा कालावधी वाढवण्याच्या पाकिस्तानच्या विनंतीला युएई कसा प्रतिसाद देईल हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सोबत पाकिस्तानच्या ७ अब्ज डॉलर्सच्या कार्यक्रमांतर्गत, युएई, सौदी अरेबिया आणि चीनने पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये कार्यक्रम संपेपर्यंत स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमध्ये एकूण १२.५ अब्ज डॉलर्सच्या ठेवी ठेवण्याचे वचन दिले आहे. मात्र, सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये पाकिस्तानला मोठी रक्कम उभे करणे महत्वाचे आहे.

Web Title: Pakistans financial crisis the uae has given a 30 day ultimatum for repayment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • financial crisis
  • pakistan
  • pakistan economic crisis
  • UAE

संबंधित बातम्या

Pakistan News : गरिबीचा वाढता विळखा; अन्न-घरासाठीच ६३% खर्च
1

Pakistan News : गरिबीचा वाढता विळखा; अन्न-घरासाठीच ६३% खर्च

Women Financial Planning: महिलांचे गुंतवणूक धोरण ठरतेय अधिक यशस्वी! बाजारातील अस्थिरतेतही ‘असा’ करतात सामना
2

Women Financial Planning: महिलांचे गुंतवणूक धोरण ठरतेय अधिक यशस्वी! बाजारातील अस्थिरतेतही ‘असा’ करतात सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.