सध्या्च्या धावपळीच्या जगात प्रत्येकजण परफ्युम वापरतो. दिवसभर बाहेर कामानिमित्त असल्याने कपड्यांना घामाची दुर्गंधी येते ही दुर्गंधी घालवण्यासाठी चांगला उपाय काय, तर परफ्युम. खरंतर सुवासिक परफ्युममुळे शरीराची दुर्गंधीच जात नाही तर मानसिकता सुधारण्यास देखील मदत होते.
मार्केटमध्ये विविध प्रकारचे परफ्युम मिळतात त्यामुळे नेमका आपण कोणता निवडावा किंवा आपल्यासाठी कोणता परफ्युम योग्य आहे हे कळत नाही. मात्र तुम्हाला माहितेय का ? या प्रश्नाचं उत्तर ज्योतिषशास्त्रात आहे. कसं ते जाणून घेऊयात.
ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या राशीप्रमाणे परफ्युम निवडल्याने कुंडलीतील ग्रहांची स्थिती सुरळीत राहण्यास मदत होते. तसंच तुमच्या मानसिकतेत देखील सकारात्मक बदल दिसून येतात.
मेष राशी
मेष राशीचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे. ही माणसं खंंबीर पण तितकीच तापट स्वभावाची असतात. त्यामुळे यांच्या अंगाक उष्णता भरपूर असते आणि म्हणूनच यांना सतत घाम जास्त येतो. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या मंडळींनी ‘मोगऱ्या’चा परफ्युम वापरला तर फायदेशीर ठरेल. मोगऱ्याच्या सुवासाने यांच्यातील राग नियंत्रित राहण्यास मदत होते.
वृषभ राशी
प्रेमाची रास म्हणून वृषभ राशीकडे पाहिलं जातं. या राशीचा स्वामी शुक्र ग्रह असल्याने ही मंडळी रोमँटीक स्वभावाची असातात.
त्यामुळे यांच्या व्यक्तित्त्वाला आणि स्वभावाला चमेलीचा परफ्युम यांना चांगले परिणाम देतो.
मिथुन
बुद्धीवान माणसांची रास म्हणजे मिथुन रास. बुध हा बुद्धीचा कारक असतो त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांचं संवादकौशल्य उत्तम असतं. चमेलीचा सुवासिक परफ्युम यांना साजेसा आहे.
कर्क राशी
चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे. ही मंडळी चंद्रासारखी शांत आणि सोज्वळ असतात. या भावनिक माणसांना लव्हेंडर फ्लेवर असलेला परफ्युम साजेसा ठरतो.
सिंह राशी
सूर्य देव या राशीचे राशी स्वामी असल्याने ही माणसं सूर्यासारखी तेजस्वी असतात. यांच्यात नेतृत्वगुण उत्तम असते या माणसांना चॉकलेट किंवा व्हॅनिला फ्लेवरचा परफ्युम फायदेशीर ठरतो.
कन्या
कन्या राशीचा स्वामी देखील बुध ग्रह आहे. ही माणसं नाजूक आणि भावनिक असतात. यांच्या व्यक्तिमत्वाला गुलाब किंवा चमेलीचा परफ्युम यांच्या सकारात्मक परिणाम देतो.
तुळ राशी
वृषभ राशीप्रमाणे तुळेचा देखील स्वामी शुक्र ग्रह आहे. तुळेतली मंडळी रोमँटीक आणि कलाकार असतात. ही माणसं त्यांच्या दिसण्याने आणि समतोल स्वभावाने इतरांचं लक्ष वेधून घेतात. यांच्या व्यक्तीमत्वाला चॉकलेट किंवा चमेल’चा परफ्य़ुम शोभतो.
वृश्चिक
वृश्चिक राशीतली माणसं गूढ स्वभावाची असतात. हे सहसा त्यांच्या मनाचा थांगपत्ता कोणाला लागू देत नाही. या राशीच्या माणसांनी चंदन आणि गुलाबचा परफ्युम वापरणं त्यांना सकारात्मक परिणाम देतं.
धनू
निश्चयी स्वभाव म्हणजे धनू रास. या राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे. ही माणसं प्रचंड प्रगल्भ आणि ज्ञानी असातात. यांच्या व्यक्तीमत्वाला चमेली आणि मोगऱ्याचा परफ्युम साजेसा ठरतो.
मकर
कष्टाळू वृत्ती मेहनत आणि संयम हे मकर राशीच्या मंडळींच वैशिष्ट्यं आहे. यांचा राशीस्वामी शनी यांना मेहनत करण्यास शिकवतो. कस्तुरी फ्लेवरचा परफ्युम वापरणं या माणसांचं व्यक्तीमत्व सुधारतं.
कुंभ
मकर प्रमाणेच कुंभ राशीचा स्वामी देखील शनी आहे. या राशीच्या माणसांना बंधन आवडत नाही. यांच्या व्यक्तिमत्त्वाला ‘इन्टेन्स वूडी किंवा अंबर नोट्स परफ्युम साजेसे आहेत.
मीन
मीन राशीचा स्वामी देखील गुरु आहे. मात्र मीन राशीची माणसं अतिशय भावनिक असतात. या राशीच्या माणसांनी कस्तुरीचा परफ्युम लावणं फायद्याचं ठरतं.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)