फोटो सौजन्य- pinterest
रत्नशास्त्रामध्ये रत्नांना विशेष महत्त्व आहे. या रत्नांचा संबंध ग्रहांशी असल्याने व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात. हे रत्न केवळ दागिन्यांचे सौदर्यं वाढवण्यासाठी नाही तर जीवनामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी देखील केला जातो. या रत्नांध्ये विविध रत्नांचा समावेश केलेला असतो. रत्नांचा वापर करुन हिरा खरा आहे की खोटा कसा ओळखायचा, जाणून घ्या
असे मानले जाते की, माणिक हे सूर्याचे रत्न आहे ते परिधान केल्यास आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि सन्मान वाढतो. माणिक रत्न हे ज्या ठिकाणाहून सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी चांदीच्या ताटात ठेवावा. त्या प्लेटवर लाल सावली दिसल्यास हिरा खरा आहे असे मानावे. खऱ्या हिऱ्यावर ओरखडे पडत नाही. तसेच भेगा किंवा बुडबुडे पडत नाही.
मोतीला चंद्राचे रत्न मानले जाते. यामुळे मानसिक शांती, भावनिक संतुलन आणि सौंदर्य वाढण्यास मदत होते. हिरा खरा की खोटा ओळखण्यासाठी एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात एक मोती टाकावा जर त्या मोत्यातून दुधाळ किरणे बाहेर पडत असतील तर ते खरे आहे. खरे हिरे हलके असतात आणि दिसायला गुळगुळीत दिसतात. खोटे हिरे खरखरीत वाटतात.
पन्ना रत्नांचा संबंध बुध ग्रहांशी आहे. ज्याचा संबंध बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि निर्णय घेण्याची शक्ती यांच्याशी संबंधित आहे. हिऱ्याची ओळख करण्यासाठी पन्ना रत्न खूप फायदेशीर आहे. खऱ्या पन्ना वर कच्ची हळद लावल्याने त्याचा रंग लाल होतो. याशिवाय, खऱ्या पन्ना मध्ये एक विशेष प्रकारची थंडावा जाणवतो आणि त्यात कोणतेही भेगा नसतात.
निळा नीलम रत्न हा शनिचा रत्न मानला जातो. हा रत्न तत्काळ परिणाम देणारा आहे. खऱ्या हिऱ्याची ओळख करण्यासाठी निळा नीलम दुधात टाकल्यास दुधाचा रंग बदलत नाही, तर बनावट नीलम हलका निळा रंग असू शकतो. खरा निळा नीलम खूप कठीण असतो आणि स्क्रॅच टेस्टमध्ये तो ओरखडा होत नाही.
गोमेद रत्नाचा संबंध राहू ग्रहांशी संबंधित आहे. याचा संबंध गोंधळ, मानसिक ताण आणि भीती दूर करतो. हिरा ओळखण्यासाठी गोमेदचा रंग आणि खोली मधासारखी असते. गोमेद रत्न हातात घेतला आणि थोडा फिरविल्यास त्यामधून प्रकाशाच्या लाटा दिसू शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)