Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sankashti Chaturthi: मुंबईतील सिद्धिविनायकाचे अनोखे मंदीर, काय आहे कहाणी

Siddhivinayak Temple: भारतातील प्रत्येक मंदिर खास आहे. पण तरीही काही मंदिरांमध्ये खूप श्रद्धा आहे. मुंबईतील एक मंदिर असे आहे जे भाविकांच्या हृदयावर राज्य करते आणि ते म्हणजे प्रभादेवीमधील सिद्धिविनायकाचे मंदिर. सेलिब्रिटीपासून सामान्य माणसांपर्यंत या मंदिरामध्ये सगळेच येतात आणि गणरायाच्या चरणी लीन होतात. पण या मंदिराचे नाव सिद्धिविनायक का ठेवण्यात आले माहीत आहे का?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 24, 2024 | 05:15 AM
सिद्धिविनायक प्रभादेवी

सिद्धिविनायक प्रभादेवी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईला लोक स्वप्नांचे शहर म्हणून ओळखतात. या शहरातील सर्व काही अद्वितीय आहे आणि मंदिरं तर आश्चर्यकारक आणि अत्यंत सुंदर आहेत. मुंबईतील प्रभादेवी येथे असलेले श्री सिद्धिविनायक मंदिर हेदेखील अशाच मंदिरांपैकी एक आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे आणि या मंदिराबाबत आपण अधिक माहिती घेऊया.  

हे मंदिर बृहन्मुंबईमध्ये असून गणपती बाप्पा आपल्या मनोकामना पूर्ण करतो असा भक्तांचा विश्वास आहे. सद्यस्थितीत सिद्धिविनायक मंदिराची इमारत पाच मजली असून येथे दूरदूरवरून लोक पूजेसाठी येतात. पण या मंदिराच्या नामकरणाची कहाणी तुम्हाला माहीत आहे का? (फोटो सौजन्य – @siddhivinayakonline instagram) 

सिद्धिविनायक नामकरणाची कथा

श्रीगणेशाची अनेक रूपे असून प्रत्येक रूपासाठी वेगळी मूर्ती बनवली जाते. परंतु ज्यांची सोंड उजवीकडे वाकलेली आहे अशा गणेशाच्या मूर्ती सिद्धपीठाशी जोडलेल्या आहेत. अशा मूर्ती असलेल्या मंदिरांना सिद्धिविनायक मंदीर नाव दिले जाते सिद्धीविनायकाचा महिमा अगाध आहे, तो भक्तांच्या मनोकामना त्वरीत पूर्ण करतो, असा समज आहे. इतकंच नाही तर सिद्धिविनायकडे साकडे घातल्यानंतर ते पूर्ण होत नाही असं नाही. सिद्धिविनायक हा असा गणपती आहे जो आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतो आणि तितक्याच लवकर रागवतोही असा याबाबत समज आहे. हे हिंदू धर्मातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे, जे मुंबईच्या केंद्रस्थानी प्रभादेवी येथे स्थित आहे. 

मंगळवारी भक्तांची रांग 

दर मंगळवारी मोठ्या संख्येने भाविक सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन मनोकामना पूर्ण करतात. सामान्य लोक या गर्दीचा भाग कायम असतात. पण मोठमोठे सेलिब्रिटीही या मंदिराला भेट देत असतात. यामध्ये अंबानी कुटुंबीय, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, अमिताभ बच्चन आणि कुटुंबीय, अशोक सराफ, सचिन पिळगावकर अशा मराठी आणि बॉलीवूडमधील अनेक नावांच्या याद्या आहेत. 

कधी होते पहिली आरती

मंदिरातील पहिली आरती पहाटे साडेपाच वाजता होते. मंदिराचे दरवाजे पूजा, नैवेद्य आणि आरतीसाठी सकाळी 10:45 ते दुपारी 1:30 पर्यंत बंद असतात. तोपर्यंत दुरूनच गणेशाचे दर्शन होणे शक्य होते. तसंच या मंदिराचे व्यवस्थापन उत्तम असून येणाऱ्या सर्व भाविकांचे योग्य स्वागतही केले जाते. 

बॉलीवूड स्टार्सची जत्रा 

कोणत्याही चित्रपटाचे प्रमोशन असो किंवा स्टार्सचे लग्न असो ते सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी नक्कीच येतात. मुंबई दर्शनासाठी आलेल्या प्रत्येकालाच या मंदिराची भुरळ पडते आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनाशिवाय कोणाचेही मुंबई दर्शन सफल होत नाही. मात्र मंगळवार अथवा संकष्टी या दिवशी या मंदिरामध्ये तुफान गर्दी असते, त्यामुळे वेळ आणि तानमान बघून जावं लागतं हे निश्चित. 

Web Title: Interesting story of siddhivinayak temple mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 05:15 AM

Topics:  

  • Siddhivinayak Temple

संबंधित बातम्या

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर राणी मुखर्जीने घेतले बाप्पाचे दर्शन, सिद्धिविनायक मंदिरातील फोटो व्हायरल
1

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर राणी मुखर्जीने घेतले बाप्पाचे दर्शन, सिद्धिविनायक मंदिरातील फोटो व्हायरल

IND vs ENG : इंग्लड दौऱ्याआधी भारताच्या प्रशिक्षकाने घेतले गणरायाचे दर्शन! कुटुंबासह केली पूजा
2

IND vs ENG : इंग्लड दौऱ्याआधी भारताच्या प्रशिक्षकाने घेतले गणरायाचे दर्शन! कुटुंबासह केली पूजा

एलॉन मस्क यांच्या आई माय मस्कने जॅकलिन फर्नांडिससोबत घेतलं सिद्धिविनायक मंदिरात दर्शन, पाहा फोटो
3

एलॉन मस्क यांच्या आई माय मस्कने जॅकलिन फर्नांडिससोबत घेतलं सिद्धिविनायक मंदिरात दर्शन, पाहा फोटो

मिलिंद गवळींनी घेतलं सपत्नीक सिद्धीविनायकाचं दर्शन, पोस्ट शेअर करत सांगितला मंदिरातील खास अनुभव
4

मिलिंद गवळींनी घेतलं सपत्नीक सिद्धीविनायकाचं दर्शन, पोस्ट शेअर करत सांगितला मंदिरातील खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.