Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Krishna Janmashtami: जन्माष्टमीच्या दिवशी घरामध्ये या ठिकाणी ठेवा मोरपंख, कुटुंबामध्ये राहील आनंदाचे वातावरण 

यंदा जन्माष्टमीचा सण शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी घरामध्ये विविध ठिकाणी मोरुपंख ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी टिकून राहते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 14, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

पंचांगानुसार, यंदा जन्माष्टमीचा सण शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे तर दहीहंडी शनिवार, 16 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येणार आहे. जन्माष्टमीचा सोहळा वृंदावन आणि मथुरेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी लोक अनेक उपाय करतात. त्यातील एक उपाय म्हणजे मोरपंख. मोरपंखाचे हे उपाय अधिक प्रभावी असे आहेत. मात्र हे मोरपंख जन्माष्टमीच्या वेळी घरामध्ये कुठे आणि कोणत्या दिशेला ठेवावे, तसेच ते ठेवल्याने काय फायदे होतात, ते जाणून घेऊया.

मोरपंख शुभ असते का

मोरपंखाचा संबंध भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे. श्रीकृष्णाला मोर आणि मोरपंख खूप आवडतात असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात मोरपंख ठेवल्याने सुख आणि समृद्धी येते. घरात मोरपंख ठेवल्याने वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा येते.

घरामध्ये कुठे ठेवावे मोरपंख

असे मानले जाते की, घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि मानसिक शांती मिळविण्यासाठी बैठकीच्या खोलीत किंवा देव्हाऱ्यात मोरपंख ठेवणे चांगले मानले जाते त्यामुळे घरामध्ये आनंद आणि शांतीचे वातावरण राहते. त्यासोबतच तुम्ही मोरपंख तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा. तसेच उत्तर दिशेला ठेवू शकता. असे केल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते. त्याबरोबरच व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होण्याची शक्यता वाढते.

Guru Gochar: 12 वर्षानंतर गुरु ग्रह कर्क राशीत करेल संक्रमण, या राशींच्या जीवनात येईल सुख समृद्धी

घरामध्ये मोरपंख ठेवण्याचे काय आहेत फायदे

मुख्य दरवाजाजवळ मोरपंख ठेवणे

मोरपंखाला वाईट नजरेपासून संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे ते घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा मुलांच्या खोलीत ठेवल्याने घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. तसेच कुटुंबाचे रक्षण देखील होते.

बेडरुममध्ये ठेवणे

घरात मोरपंख ठेवल्याने वातावरण शुद्ध आणि उर्जेने भरलेले राहते. त्यामुळे घरात सकारात्मक उर्जा प्रवेश करते आणि व्यक्तीवरील मानसिक ताण कमी होतो आणि मन शांत राहते. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. विशेषतः बेडरूममध्ये ठेवल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.

MaSik Kalashtami: मासिक कालाष्टमीच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्याने आर्थिक समस्या आणि जुने आजार होतील दूर

अभ्यासाच्या खोलीत ठेवा

अभ्यासाच्या खोलीत किंवा ज्या ठिकाणी मुल अभ्यासाला बसतात त्याठिकाणी मोरपंख ठेवल्याने मुलांमधील एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते. त्याची ऊर्जा मनाला स्थिर करते आणि विचलित होण्यास प्रतिबंध करते. विद्यार्थ्यांसाठी ते विशेषतः फायदेशीर मानले जाते.

देव्हाऱ्यात ठेवणे

भगवान श्रीकृष्णांना मोरपंख खूप आवडते त्यामुळे ते देव्हाऱ्यात ठेवल्याने त्यांचे आशीर्वाद अबाधित राहतात. देव्हाऱ्यात भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती किंवा फोटोजवळ हे ठेवणे फायदेशीर मानले जाते. यामुळे जीवनात आनंद, शांती, सौभाग्य आणि आध्यात्मिक प्रगती होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Janmashtami 2025 benefits of keeping peacock feathers in this place at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • Krishna Janmashtami
  • religions

संबंधित बातम्या

Mangalagauri Vrat: दुसऱ्या श्रावण मंगळवारी असे करा मंगळागौरीचे व्रत, जाणून घ्या कथा
1

Mangalagauri Vrat: दुसऱ्या श्रावण मंगळवारी असे करा मंगळागौरीचे व्रत, जाणून घ्या कथा

Garuda Purana: गरुड पुराणातील यमलोक आणि नरकाची कथा काय सांगते? जाणून घ्या या ग्रंथाचे महत्त्व
2

Garuda Purana: गरुड पुराणातील यमलोक आणि नरकाची कथा काय सांगते? जाणून घ्या या ग्रंथाचे महत्त्व

Shivlilamrut: शिवलीलामृतच्या १३व्या अध्यायातील दक्षयज्ञापासून शिव-पार्वती विवाहापर्यंतची संपूर्ण कथा जाणून घ्या
3

Shivlilamrut: शिवलीलामृतच्या १३व्या अध्यायातील दक्षयज्ञापासून शिव-पार्वती विवाहापर्यंतची संपूर्ण कथा जाणून घ्या

Budhaditya Yoga: श्रावणातील दुसऱ्या सोमवारी तयार होत आहे बुधादित्य योग, या राशींच्या लोकांना मिळणार सुख-संपत्तीचा लाभ
4

Budhaditya Yoga: श्रावणातील दुसऱ्या सोमवारी तयार होत आहे बुधादित्य योग, या राशींच्या लोकांना मिळणार सुख-संपत्तीचा लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.