फोटो सौजन्य- pinterest
जन्माष्टमीचा सण शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा देखील करण्यात येईल. जन्माष्टमीचा दिवस कोणत्या मूलांकाच्या लोकांसाठी शुभ असणार आहे, जाणून घ्या
जन्माष्टमीचा सण शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. हा दिवस मूलांक 4 असणाऱ्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. या लोकांवर श्रीकृष्णांचा विशेष आशीर्वाद असणार आहे. त्यामुळे या लोकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येऊ शकते. तसेच आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. यावेळी तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात. जन्माष्टमीच्या दिवशी या लोकांनी केलेल्या कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. त्यासोबतच तुमची जीवनामध्ये प्रगती होऊ शकते.
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झाला आहे अशा लोकांना जन्माष्टमीच्या दिवशी पदोन्नतीची आनंदाची बातमी मिळू शकते. या दिवशी तुम्ही घर, दुकान, वाहन किंवा इतर कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार करु शकता. कोणतेही व्यवहार करण्यासाठी जन्माष्टमीचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. या लोकांच्या जीवनामध्ये प्रेम वाढेल. तसेच वैवाहिक जीवन चांगले राहील.
ज्या लोकांचा जन्न कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला झाला आहे अशा लोकांचा मूलांक 3 असेल. या लोकांना जन्माष्टमीला ज्येष्ठ महिलेकडून मदत मिळू शकते. या लोकांना नोकरीत किंवा व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळेल. या लोकांना संधीचा पुरेपूर फायदा होऊ शकतो. यावेळी तुमचा दिवस आनंदात जाईल. या काळात वैवाहिक जीवन चांगले राहील.
मूलांक 6 असलेल्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी पगारवाढीसारखी चांगली बातमी मिळू शकते. या लोकांचा जन्माष्टमीचा दिवस उर्जेने भरलेला राहील. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला झाला आहे त्या लोकांचा मूलांक 6 राहील. हे लोक धार्मिक कार्यामध्ये देखील सहभाग घेतील.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा जन्माष्टमीचा दिवस चांगला राहील. हे लोक या काळामध्ये नवीन गाडी खरेदी करु शकतात. तसेच या काळाच तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. जन्माष्टमीला पैसे कमावण्याच्या चांगली संधी उपलब्ध होईल. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झालेला आहे त्याचा मूलांक 7 असेल. या काळात तुम्ही नोकरी आणि व्यवसायात पुढे जाण्यास अपेक्षित यश मिळू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)