फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रामध्ये वर्णन केल्यानुसार व्यक्तीच्या शरीराची रचना, गुण आणि वैशिष्ट्यांवर आधारित असते त्यामुळे व्यक्तीचे स्वरूप, भाग्य आणि भविष्य समजण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीराच्या विविध भागांवर केस असणे खूप महत्त्वाचे मानले जाते. पाठीवर केस असण्याला एक वैशिष्ट्य आहे ज्याचा उल्लेख सामुद्रिकशास्त्रामध्ये करण्यात आलेला आहे.
सामुद्रिकशास्त्रात म्हटल्यानुसार, शरीराच्या वेगवेगळ्या भागावर केस असल्यास त्याचा संबंध व्यक्तीच्या स्वभाव, भाग्य आणि ग्रहांच्या स्थितीशी जोडलेला असतो. केसांचे प्रमाण, रंग आणि स्थान यावर अवलंबून असते की पाठीवर केस असणे शुभ आहे की अशुभ. पाठीवर केस असणाऱ्या लोकांमध्ये विशेष वैशिष्ट्य असल्याचे मानले जाते. त्यामुळे व्यक्तीमधील शक्ती, धैर्य आणि आर्थिक स्थिती दर्शविली जाते. शरीराच्या काही भागावर असणाऱ्या केसांमुळे त्याचा व्यक्तीवर सकारात्मक परिणाम होतो आणि काही लोकांना नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागू शकते. पाठीवर केस असण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त दिसून येते. कारण यामागे एक अर्थ दडलेला आहे. दरम्यान महिलांच्या पाठीवर काही प्रमाणात केस असू शकतात. पाठीवर केस असणे शुभ की अशुभ जाणून घ्या
सामुद्रिकशास्त्राच्या मते, पाठीवर केस असणे शुभ मानले जाते. हे व्यक्तीमधील शौर्य, धैर्य आणि जबाबदारीचे प्रतीक दर्शवते. यामुळे हे लोक कठीण परिस्थितींना धैर्याने तोंड देत नाही तर कुटुंब आणि समाजाप्रती एकनिष्ठ आणि कर्तव्यदक्ष देखील असतात. ज्या लोकांच्या पाठीवर केस असतात त्या लोकांना धन आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात. मान्यतेनुसार, या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा राहते. ज्यामुळे या व्यक्तीची आर्थिक स्थिती देखील चांगली राहते. त्यामुळे कठोर मेहनत घेतल्यास तु्म्हाला नशिबाची साथ देखील मिळते. या लोकांमधील नेतृत्व क्षमता आणि आत्मविश्वास देखील वाढलेला राहतो.
पाठीवर केस असलेले लोकांचा स्वभाव धाडसी आणि निष्ठावान असतात. हे लोक कोणतेही निर्णय घेताना आपल्या निर्णयांवर ठाम राहतात आणि येणाऱ्या आव्हानांना धाडसाने तोंड देतात. त्यामुळे या लोकांना ची जबाबदारी आणि निष्ठा त्यांना कुटुंब आणि मित्रांमध्ये लोकप्रिय बनवते. हे लोक कार्यक्षेत्रामध्ये खूप मेहनत घेतात त्यामुळे या लोकांना यश आणि प्रतिष्ठा मिळते. त्याचबरोबर हे लोक आपले ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत घेतात. त्यामुळे या लोकांचा आर्थिक स्थिती स्थिर राहते.
पाठीवर केस असणे शुभ मानले जाते. जर केस खूप दाट आणि जाड असतील तर ते एखाद्या व्यक्तीच्या रागीट स्वभावाचे प्रतिनिधित्व करते. मात्र या प्रकारचे लोक घाईघाईने निर्णय घेऊ शकतात त्यामुळे या लोकांचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. या लोकांनी कायम संयम राखला पाहिजे. तसेच ज्या व्यक्तीच्या पाठीवर केस जास्त असतात त्या लोकांना आर्थिक किंवा मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा लोकांनी मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करणे आणि गुरुवारी गुरु मंत्रांचा जप करणे हे उपाय करणे खूप फायदेशीर मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)