फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य रविवार, 17 ऑगस्ट रोजी सिंह राशीमध्ये प्रवेश करत आहे. ज्या ठिकाणी केतू हा आधीच उपस्थित आहे. सिंह राशीमध्ये केतू आणि सूर्याची युती 18 वर्षांनी होत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य आणि केतू यांच्यात शत्रुत्वाची भावना असते म्हणून या दोन्ही ग्रहांची युती शुभ मानली जात नाही. ग्रहांची युती शुभ आणि अशुभ या दोन्ही प्रकारची असते. सूर्य आणि केतुच्या अशुभ संयोगामुळे काही राशींच्या लोकांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. कोणत्या राशीच्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागेल, जाणून घ्या
सिंह राशीमध्ये सूर्य आणि केतुची होणारी युती या लोकांसाठी अशुभ मानली जाते. या युतीमुळे सिंह राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये हानिकारक ठरू शकते. ही युती या राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये पहिल्या घरात होणार आहे. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा कमी होऊ शकते. या काळामध्ये तुमचा मान सन्मान देखील कमी होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना लोकांना या काळात अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. व्यवसायानिमित्त जे लोक प्रवास करणार आहे त्या लोकांनी सावध राहावे, अपघात होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणाकडूनही पैसे उधार घेणे टाळावे.
कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि केतूची युती अशुभ मानली जाते. यामुळे तुम्हाला कामात विविध प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. ही युती तुमच्या कुंडलीमध्ये सातव्या घरात होणार आहे. ज्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन आणि भागीदारीवर प्रतिकूल परिणाम होताना दिसून येतील. या काळामध्ये तुम्हाला वैवाहिक जीवनात तणावाचा सामना देखील करावा लागू शकतो. जर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात भागीदारीमध्ये काम करत असाल तर तुमच्यासाठी हा काळ चांगला राहणार नाही. मात्र या काळाच आरोग्य चांगले राहील.
मीन राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि केतूच्या युतीचा प्रभाव चांगला आहे असे म्हणता येणार नाही. ही युती या राशीच्या कुंडलीमध्ये सहाव्या घरात असेल. अशा वेळी रोग आणि शत्रूंची संख्या वाढू शकते. ज्या लोकांचा न्यायालयात खटला सुरू आहे त्या लोकांना निराशाजनक बातमी मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत सूर्य आणि केतुच्या अशुभ संयोगामुळे नाही.)