फोटो सौजन्य- pinterest
जया एकादशी ही नावाप्रमाणेच यश, कीर्ती मिळवून देणारी एकादशी आहे. माघ महिन्याच्या शु्क्ल पक्षातील तिथीला एकादशी तिथी साजरी केली जाते. यंदा शनिवार, 8 फेब्रुवारी रोजी हे व्रत पाळले जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते, सर्व कामांमध्ये यश मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. हे व्रत भक्तीभावाने केले तर ईश्वरकृपा होतेच. प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व आहे.
माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी शुक्रवार, 7 फेब्रुवारी रोजी रात्री 09:27 वाजता सुरू होत आहे. या तिथीची समाप्ती शनिवार 8 फेब्रुवारी रोजी रात्री 8.14 वाजता संपेल. उद्य तिथीनुसार जया एकादशीचे व्रत शनिवार 8 फेब्रुवारी रोजी पाळले जाणार आहे. पंचांगानुसार जया एकादशीचा उपवास सोडण्याची वेळ 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.4 ते 9.17 वाजेपर्यंत आहे.
पंचांगानुसार, जया एकादशीला रवी योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रात हा योग खूप शुभ मानला जातो. असे मानले जाते की, या योगात पूजा केल्याने दुप्पट लाभ मिळतो.
जया एकादशीचे व्रत पाणी पिऊन किंवा फक्त फलाहार घेऊन करणे उत्तम ठरते. या दिवशी मांस आणि मद्य सेवन करू नये. पूर्णपणे निरोगी व्यक्ती असल्यास आणि आरोग्याची काळजी घेऊन निर्जल उपवास करावा. या दिवशी भात खाण्यास मनाई आहे. मीठ देखील खाऊ नये. तसेच उपवासाच्या वेळी रताळे खाऊ शकता. तुम्ही दूध, दही आणि फळेदेखील खाऊ शकता.
धार्मिक शास्त्रानुसार, एकादशीच्या दिवशी उपवास ठेवण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्री विष्णूची पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. असे मानले जाते की हे व्रत आरोग्य, सुखी वैवाहिक जीवन आणि शांती प्रदान करते. म्हणून या दिवशी खऱ्या मनाने व्रत करून श्री विष्णूचे ध्यान करावे.
घरापासून जर्सीपर्यंत धोनीच्या 7 क्रमांकाचे दडले आहे मोठे रहस्य
शनिवारी सूर्योद्यापासून रात्रीझोपेपर्यंत आपण श्रीशाश्वत या विष्णूंच्या एका नावाचा जप करा. हा जप करताना फक्त सातत्याने मनातल्या मनात श्रीशाश्वत श्रीशाश्वत असा जप करणे अपेक्षित आहे. या नामाला आधी किंवा नंतर ओम किंवा नमः वगैरे लावायचे नाही. जे कोणी उपवास करत नाही त्यांनी या मंत्रांचा जप करावा.
ओम नमो भागवते वासुदेवाय नमः
ओम हूं विष्णवे नमः
ओम नमो नारायण श्री मन नारायण नारायण हरि हरि
ओम नारायणाय नमः
ओम हीं श्री लक्ष्मीवासुदेवाय नमः
ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोद्यात ओम विष्णवे नमः या मंत्रांचा देखील जप करावा.
( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)