
हिंदू धर्मात प्रदोष व्रताला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा केली जाते. यामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. ( फोटो सौजन्य- फेसबुक)
हिंदू धर्मात प्रदोष व्रताला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा केली जाते. यामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. या महिन्यात 2 प्रदोष व्रत केले जातात, पहिला कृष्ण पक्षाचा आणि दुसरा शुक्ल पक्षाचा. ज्येष्ठ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत पार पडले. आता दुसरे प्रदोष व्रत केले जाणार आहे. ज्येष्ठ महिन्याचा दुसरा प्रदोष कधी ठेवला जाईल, नेमकी तिथी, शुभ मुहूर्त काय आहे ते जाणून घेऊया.
प्रदोष व्रताची तिथी
वैदिक पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीची सुरुवात 19 जून रोजी सकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी होणार आहे आणि त्याची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 जून रोजी सकाळी 7 वाजून 49 मिनिटांनी होणार आहे. प्रदोष व्रताची पूजा प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी केली जाते. यावेळी प्रदोष व्रत १९ जून रोजी पाळले जाणार आहे. हे प्रदोष व्रत बुधवारी होणार आहे, म्हणून त्याला बुध प्रदोष व्रत असे म्हणतात.
पूजेची शुभ वेळ
बुध प्रदोष व्रताची शुभ मुहूर्त 19 जून रोजी संध्याकाळी 7 वाजून 22 मिनिटांपासून ते रात्री 9 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल. या काळात तुम्ही भगवान शंकराची पूजा करू शकता.
बुध प्रदोष व्रताचे महत्त्व
धार्मिकशास्त्रानुसार, जो बुद्ध प्रदोष व्रत करतो, त्याच्या जीवनातील संकटे दूर होतात आणि त्याच्या जीवनात सुख-शांती नांदते. याशिवाय ग्रह दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठीही हे व्रत पाळणे फायदेशीर ठरते.
पूजेची पद्धत
प्रदोष पूजेच्या वेळी सकाळी लवकर उठून आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला.
त्यानंतर भगवान शंकरासमोर तुपाचा दिवा लावा.
दूध, दही, तूप, गंगाजल इत्यादी वस्तूंनी शिवलिंगावर अभिषेक करा.
त्यानंतर शिवला चंदन, बेलपत्र, मदार, पुष्प, भांग इत्यादी अर्पण करा.
यानंतर, चालीसा-आरतीने पूजेची सांगता करा आणि भगवान शंकराला त्यांचे आवडते अन्न अर्पण करा.