फोटो सौजन्य- istock
ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथील जेठ पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व पौर्णिमा विशेष असतात मात्र ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेच्या दिवशी काही लोक उपवास करतात. तसेच ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधीवत पूजा केली जाते. त्याचबरोबर चंद्रदेवाचीही पूजा केली जाते. या दिवशी राशीनुसार काही गोष्टींचे दान केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने भरपूर संपत्ती प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
पंचांगानुसार, ज्येष्ठ पौर्णिमा तिथीची सुरुवात मंगळवार, 10 जून रोजी सकाळी 11.35 वाजता होईल आणि त्याची समाप्ती बुधवार 11 जून रोजी दुपारी 1.13 वाजता होईल. उद्यतिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 11 जून रोजी साजरी केली जाईल.
मेष राशीच्या लोकांनी खीर दान करावी. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल.
वृषभ राशीच्या लोकांनी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी गरजूवंतांना दही किंवा तुपाचे दान करावे.
मिथुन राशीच्या लोकांनी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी दूध किंवा तांदळाचे दान करावे त्यामुळे या राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल
कर्क राशीच्या लोकांना दूध आणि साखरेचे मिश्रण असलेले अन्न दान करावे. यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.
सिंह राशीच्या लोकांना गुळाचे दान करणे शुभ मानले जाते. हे दान केल्याने ग्रहांची स्थिती मजबूत होते आणि जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात.
कन्या राशीच्या लोकांनी ज्येष्ठ पौर्णिमेला खिरीचे दान केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो.
तूळ राशीच्या लोकांनी दूध, तांदूळ आणि तूप या गोष्टींचे दान केल्याने लक्ष्मी नारायण प्रसन्न होतात, असे मानले जाते
वृश्चिक राशीच्या लोकांना ज्येष्ठ पौर्णिमेला लाल रंगाची वस्तू दान करावी, यामुळे तुमच्या कुंडलीत ग्रहदोष असल्यास ते दूर होण्यास मदत होते.
ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी धनु राशीच्या लोकांनी डाळींचे दान केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते.
मकर राशीच्या लोकांनी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये तांदूळ सोडावे त्यामुळे तुम्हाला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. तसेच आर्थिक लाभाची शक्यता असते.
कुंभ राशीच्या लोकांनी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी गरजूंना अन्नदान करावे. यामुळे आर्थिक समस्या दूर होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कुटुंबावर राहतो.
मीन राशीच्या लोकांनी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी ब्राम्हणांना अन्नदान करावे. असे केल्याने तुमच्या परिवारावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)