फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात कार्तिक महिना खूप पवित्र मानला जातो यालाच धर्ममास असे म्हटले जाते. असे म्हटले जाते की हा महिना विष्णूंच्या उपासनेसाठी आणि भक्तीसाठी समर्पित आहे. यावेळी कार्तिक महिन्याची सुरुवात 7 ऑक्टोबरपासून झालेली आहे आणि 5 नोव्हेंबर रोजी हा महिना संपणार आहे. या महिन्यात हिवाळ्याची सुरुवात होते आणि बदलत्या हवामानामुळे आजार वाढण्याचा धोका संभवतो. त्यामुळे या महिन्यात काही पदार्थाचे सेवन करणे टाळावे. तर काही पदार्थांचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. कार्तिक महिन्यात काय खावे आणि काय खाऊ नये, जाणून घ्या
कार्तिक महिन्यात वांगीचे सेवन करणे टाळावे, असे मानले जाते. या महिन्यात पित्त दोषाशी संबंधित समस्या होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. याशिवाय वांगीचे सेवन केल्याने पित्त दोष वाढण्याटी शक्यता असते. म्हणून शक्यतो कार्तिक महिन्यामध्ये वांगी खाऊ नये. वांगी हे उत्तेजक असल्याने धार्मिकदृष्ट्या अशुभ मानले जाते आणि या महिन्यात ब्रह्मचर्य पाळले पाहिजे.
कार्तिक महिन्यामध्ये दह्यांचे सेवन करु नये असे म्हटले जाते. कारण कार्तिक महिन्यात ते आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. कार्तिक महिन्यात दही खाणे मुलांसाठी चांगले मानले जात नाही. दरम्यान या काळात तुम्ही दह्याऐवजी दुधाचा वापर करू शकता. तसेच या महिन्यात कांदे आणि लसूण सारखे पदार्थ खाण्याचे देखील टाळावे.
कार्तिक महिन्यात तामसिक पदार्थ खाणे निषिद्ध मानले जाते. कारण या महिन्यात मासे खाणे धार्मिक दृष्टिकोनातून अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की या महिन्यात भगवान विष्णू पाण्यात मत्स्य अवतार धारण करतात. म्हणूनच कार्तिक महिन्यात मासे खाणे निषिद्ध मानले जाते. याशिवाय आषाढ महिन्यात मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे पाणी प्रदूषित होऊ शकते. म्हणूनच, वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही ते सेवन करणे अयोग्य मानले जाते.
कार्तिक महिन्यात कारल्याचे सेवन करणे टाळावे असे मानले जाते. कारण या महिन्यात वनस्पती गॅस तयार करणारी मानली जाते आणि कधीकधी त्यावर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे या काळात कारले खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. म्हणूनच कार्तिक महिन्यात कारले खाणे अयोग्य मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)