Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kendra Trikon Rajyog: केंद्र त्रिकोण योगामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

ज्योतिषशास्त्रानुसार, शुभ आणि शक्तिशाली असा योग म्हणजे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. या काळात आर्थिक लाभ, यश आणि पदोन्नती मिळू शकते. केंद्र त्रिकोण योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 04, 2026 | 09:10 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • केंद्र त्रिकोण योग म्हणजे काय
  • केंद्र त्रिकोण योग कोणत्या राशीत तयार होणार
  • केंद्र त्रिकोण योगाचा कोणत्या राशीच्या  लोकांना फायदा होणार
 

सोमवार, 2 मार्च रोजी शुक्र ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला आहे. त्या राशीत आधीच शनि उपस्थित आहे. शुक्राचा त्याच्या उच्च राशीत, मीन राशीत प्रवेश केल्याने मालव्य राजयोग तयार होत आहे. याव्यतिरिक्त, कुंडलीत केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीत शुक्राचे उच्च स्थान शनिसह केंद्र त्रिकोण राजयोग तयार करत आहे.

केंद्र त्रिकोण राजयोगामुळे या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि भौतिक सुखसोयी मिळतील. केंद्र त्रिकोण राजयोगामुळे काही राशींना लक्षणीय फायदा होणार आहे. यावेळी शुक्र ग्रह 26 मार्चपर्यंत शुक्र राशीत राहणार आहे. त्यानंतर तो मेष राशीमध्ये संक्रमण करेल. म्हणजे या 25 दिवसांमध्ये या संक्रमणाचा काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे.

कसा तयार होतो केंद्र त्रिकोण राजयोग

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा केंद्र आणि त्रिकोण घरांचे स्वामी शुभ स्थितीत येतात तेव्हा राजयोग तयार होतो. मीन राशीत शुक्र ग्रह उच्च मानला जातो आणि त्या राशीत शनिची उपस्थिती आधीच या युतीला अधिक शक्तिशाली बनवते. ही युती 26 मार्चपर्यंत राहील, या दरम्यान अनेक लोकांना त्यांच्या करिअर आणि आर्थिक बाबींशी संबंधित चांगल्या बातम्या मिळू शकतात.

zodiac sign: सुकर्मा योगाचा सिंह आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

या राशीच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोग शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. मेष राशीच्या लोकांची संपत्ती वाढेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. या काळात लग्न करू इच्छिणाऱ्यांना लग्नाचा प्रस्ताव मिळू शकेल.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांचा या काळामध्ये त्रास संपेल. हा काळा वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील. करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. या काळात व्यवसायातील लोकांना फायदा होईल. त्याचबरोबर तुम्हाला कामामध्ये अपेक्षित यश मिळेल.

Numberlogy: मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोग प्रभावशाली राहणार आहे. या काळात तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होताना दिसून येतील. धनु राशीच्या व्यक्तींना आर्थिक प्रगतीचा अनुभव येईल. जीवनात आनंद येईल. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना यश मिळू शकेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: केंद्र त्रिकोण राजयोग म्हणजे काय?

    Ans: जन्मकुंडलीतील केंद्र (१, ४, ७, १०) आणि त्रिकोण (१, ५, ९) स्थानांचे स्वामी ग्रह एकत्र येणे किंवा परस्पर दृष्टी देणे यामुळे तयार होणारा शुभ योग म्हणजे केंद्र-त्रिकोण राजयोग. हा योग भाग्य, प्रतिष्ठा आणि प्रगती देणारा मानला जातो.

  • Que: या योगाचा करिअरवर कसा परिणाम होतो?

    Ans: या काळात नोकरीत पदोन्नती, पगारवाढ, वरिष्ठांचे सहकार्य आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. मेहनतीला योग्य फळ मिळण्याची शक्यता वाढते.

  • Que: केंद्र त्रिकोण राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार

    Ans: केंद्र त्रिकोण राजयोगाचा मेष, वृषभ आणि धनु राशीच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Kendra trikon rajyog people of this zodiac sign will get the expected success in career and business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Vishwakarma Puja: कधी आहे विश्वकर्मा पूजा, जाणून घ्या पूजा वेळ, शुभ योग आणि महत्त्व
1

Vishwakarma Puja: कधी आहे विश्वकर्मा पूजा, जाणून घ्या पूजा वेळ, शुभ योग आणि महत्त्व

Numberlogy: गौरी आगमनाच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल नोकरी व्यवसायात फायदा
2

Numberlogy: गौरी आगमनाच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल नोकरी व्यवसायात फायदा

Gauri Aagman 2026: गौरी आगमनावेळी उंबरठ्यापासून देवघरापर्यंत गौरीची पावले का काढतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
3

Gauri Aagman 2026: गौरी आगमनावेळी उंबरठ्यापासून देवघरापर्यंत गौरीची पावले का काढतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Trikal Sandhya: त्रिकाल संध्या म्हणजे काय? प्रातः, माध्यान्ह आणि सायंसंध्येचे महत्त्व जाणून घ्या
4

Trikal Sandhya: त्रिकाल संध्या म्हणजे काय? प्रातः, माध्यान्ह आणि सायंसंध्येचे महत्त्व जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.