फोटो सौजन्य- फेसबुक
आषाढ महिन्याच्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते. दीप अमावस्येच्या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते.
पौर्णिमा किंवा अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना सुरु होण्याच्या एक दिवसापूर्वी ही अमावस्या साजरी केली जाते. धार्मिक शास्त्रानुसार, राज्यातील प्रत्येक भागात ती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते. या अमावास्येला दीपपूजनाला अधिक महत्व प्राप्त झालं असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे.
हेदेखील वाचा- सापांनाही भीती वाटते, या गोष्टी पाहून ते दूर पळतात, जाणून घ्या
दीप अमावस्या शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, दीप अमावस्या 4 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. ही अमावस्या 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी सुरु होऊन 4 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजून 42 मिनिटांनी संपेल. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 5 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरु होईल.
हेदेखील वाचा- पांढऱ्या शर्टवरील डाग कसे काढायचे? जाणून घ्या
दीप अमावस्येचे महत्त्व
आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व आहे. आषाढ अमावस्येला दिव्यांची खास आरास केली जाते. तसेच त्यांचे पूजनही केले जाते. दिवा हा मांगल्याचा, समृद्धी आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो. आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीप पूजन करुन दीप अमावस्या साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हटला जातो.
दिव्यांची पूजा कशी करायची
दीप अमावस्येला पहाटे लवकर उठून स्नान करावे. तसेच स्वच्छ वस्त्र परिधान करा.
घरातील सर्व दिवे धुवून स्वच्छ करावेत. देवघरासमोर पाट किंवा चौरंग मांडून त्याच्याभोवती सुंदर रांगोळी काढावी.
पाटावर लाल रंगाचे वस्त्र अंथरुन निरांजन, समई आणि पिठाचे दिवे मांडावेत.