फोटो सौजन्य- pinterest
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कोजागिरी पौर्णिमा आहे. या दिवशी रात्री मसाले दूध किंवा खीर तयार करुन त्याचा नैवेद्य दाखवला जातो. सोमवार हा चंद्र देवाचा आणि कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या कुंडलीमधील चंद्रदोष दूर करण्यासाठी तुम्ही काही उपाय करु शकता. चंद्र दोष दूर झाल्याने मानसिक शांती, आनंद आणि समृद्धी मिळते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार कोणते उपाय करायचे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध आणि तांदूळ यांचे दान करावे. त्यानंतर शिवलिंगावर दूध आणि मधाने अभिषेक करावा. तसेच या दिवशी ओम चंद्राय नम: या मंत्राचा जप करावा.
वृषभ राशीच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तांदळाची खीर गरिबांना द्यावी. या दिवशी घरी देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करावी. त्यामुळे चंद्रदोष दूर होण्यास मदत होईल.
मिथुन राशीच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महादेवांची पूजा करावी. हरभरे आणि हिरवे कपडे यांचे दान करावे. तसेच तुळशीला पाणी अर्पण करावे.
कर्क राशीच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गोठ्यात चारा दान करा. त्यानंतर शिवलिंगावर दूध अर्पण करावे. रात्री पाण्यात दूध मिसळून चंद्राला अर्पण करा.
सिंह राशीच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदोष दूर करण्यासाठी चंद्राची पूजा करावी. पांढरी फुले आणि साखर अर्पण करा. त्याचसोबत ब्राम्हणांना कपडे आणि अन्न दान करा.
कन्या राशीच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या त्रासांपासून मुक्ती मिळविण्यासाठी विष्णू सहस्रनामाचे पठण करा. संपूर्ण मूग, हिरवे कपडे आणि तुळशीची पाने दान करा.
तूळ राशीच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दही आणि पांढरे कपडे दान करावेत. तसेच लहान मुलींना जेवण द्यावे आणि लक्ष्मी आणि नारायणाची पूजा करावी.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या त्रासांपासून मुक्ती मिळविण्यासाठी शिवलिंगावर मध, दूध आणि पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करावा.
धनु राशीच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी विष्णू मंदिरात जाऊन पूजा करावी. यावेळी केळी अर्पण करा, पिवळे कपडे आणि हळद आणि केशर असलेली खीर तुमच्या गुरूंना दान करा. यामुळे चंद्र दोष दूर होतील.
मकर राशीच्या लोकांनी चंद्रदोष दूर करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शिवाची पूजा करावी. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि चंद्र मंत्राचा जप करावा.
कुंभ राशीच्या लोकांनी चंद्रदोष दूर करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात पांढरे चंदन ओतून शिवलिंगावर अभिषेक करावा. त्यासोबतच गरजूंना खीर दान करावी.
मीन राशीच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध, पांढरी मिठाई आणि चांदीचे दान करावे. ओम सोमय नम: या मंत्राचा जप करावा. यामुळे चंद्राचे त्रास दूर होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)