Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi 2026: होळीचा सण विविध राज्यात साजरा करण्यामागील काय आहे परंपरा, जाणून घ्या

होळी हा रंगाचा, मांगल्याचा, आनंदाचा सण समजला जातो. संपूर्ण भारतात हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो. प्रांतानुसार, राज्यानुसार त्यात सांस्कृतिक वैविध्यही आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 28, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करणे
  • विविध राज्यात साजरा करण्यामागील परंपरा
  • विविध राज्यात होळी कशी साजरी केली जाते
 

भारतीय मन निसर्गत:च उत्सवांचा आणि परंपरांचा आदर करणारे आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आणि कृषीशी संबंधित जीवनशैलीत पोसल्या गेलेल्या भारतीय समाजमनाला निसर्गाचा सोहळा साजरा करावासा वाटला तर त्यात नवल ते काय! हुताशनी पौर्णिमा अर्थात होळीचा सणही याला अपवाद नाही. विविध राज्यात होळीचा सण कसा साजरा केला जातो, जाणून घ्या

बंगाल

बंगाल प्रांतात गौडीय वैष्णव उत्सव म्हणून होळीचे महत्त्व अविवाद्य आहे. भगवान कृष्ण आणि होळी यांचा एक अविभाज्य संबंध भारतीय संस्कृतीत मान्यता पावलेला आहे. उत्तर भारतातील वृंदावन, मथुरा या ठिकाणी कृष्ण मंदिरांमध्ये होळीचा सण उत्साहाने आणि पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो. नंदगावहून आलेले पुरुष स्वत:ला गोपजन असे संबोधतात आणि स्त्रिया या गोपी असल्याचे मानले जाते.

Holika Dahan 2026: होलिका दहनेच्या राखेचा करा ‘हा’ छोटासा उपाय, वास्तूदोष होईल दूर

बरसाना

बरसाना येथील श्रीजी मंदिरातील ‘लाठमार होळी’ प्रसिद्ध आहे. हातात रंगीत लाकडी लाठया घेतलेल्या महिला पुरुषांना लाठीने मारतात आणि पुरुष स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतात, असा एक सोहळा होतो. रंगांची उधळण करीत स्त्रिया आणि पुरुष एकत्र नृत्य करतात.

बलराम मंदिर परिसरातही रंगांची उधळण केली जाते. राधावल्लभ मंदिरात राधा आणि कृष्ण यांचा विवाह साजरा करून होळीचा आनंद वाढविला जातो. लोकगीते म्हणत लोकनृत्याचा आनंद घेत उत्तर भारतीय भक्त होळीचा आनंद लुटतात.

दक्षिण भारतात मात्र भगवान शंकराने कामदेव मदनाला दिलेल्या शापाचा संदर्भ होळीशी जोडला गेला आहे. बंगाल आणि ओडिशामध्ये या काळात ‘दोलोत्सव’ साजरा केला जातो.

गोवा

गोव्यामधील मंदिरांमध्ये होळी पौर्णिमेनिमित्त देवांची पालखी निघते. महाराष्ट्राच्या कोकण प्रांतामध्ये शिमगोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. ग्रामदेवतेची पालखी, शिमग्याची पारंपरिक सोंगे यांचे विशेष मानाचे स्थान कोकणच्या भूमीत रुजलेले अनुभवायला मिळते. महाराष्ट्रात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. होळीला नारळ अर्पण करून तो खरपूस भाजलेला नारळ प्रसाद म्हणून स्वीकारला जातो. महिला होळीची पूजा करतात, तिला प्रदक्षिणा घालतात. काही कुटुंबात होळीच्या दिवशी घरातील देवघरासमोर छोटीशी होळी प्रज्वलित करण्याचीही पद्धत आहे.

Baglamukhi Devi: कोर्ट-कचेरीतील अडथळे दूर करणारी शक्ती, बगलामुखी देवीचे काय आहे महत्त्व जाणून घ्या

मणिपूरमध्येही होळीचा सण उत्साहाने साजरा केला जातो

उत्तर भारतातही होळी आणि रंगपंचमीचा सण आनंदाने साजरा केला जातो. कामानिमित्त कुटुंबापासून लांब असलेली मंडळी आवर्जून होळीला येतात. मिठाई भेट दिली जाते. आवर्जून पांढरे कपडे घालून एकमेकांवर रंगांची उधळण केली जाते. नृत्याचा आनंद घेतला जातो.

एकूणच माणसाच्या शरीर मनाला उल्लसित करणारा, वसंत ॠतूचे स्वागत करणारा, वाईट विचारांची आणि प्रवृत्तींची राखरांगोळी करायला शिकविणारा होळीचा सण! देशातील विविध भागातही आनंदाने साजरा केला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: होळी साजरी करण्यामागील प्रमुख पौराणिक कथा कोणती?

    Ans: होळीमागे भक्त प्रल्हाद आणि होलिका यांची कथा प्रचलित आहे. वाईट प्रवृत्तींचा नाश आणि भक्तीचा विजय याचे प्रतीक म्हणून होलिका दहन केले जाते.

  • Que: उत्तर भारतात होळीला विशेष महत्त्व का आहे?

    Ans: मथुरा आणि वृंदावन येथे भगवान श्रीकृष्णाशी होळीचा संबंध जोडला जातो. येथे रंगोत्सव, फुलांची होळी आणि लाठमार होळी अशा पारंपरिक पद्धतीने सण साजरा केला जातो.

  • Que: महाराष्ट्रात होळी कोणत्या परंपरेनुसार साजरी केली जाते?

    Ans: महाराष्ट्रामध्ये होळी पौर्णिमेला होलिका दहन करून दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. कोकणात शिमगोत्सव, ग्रामदेवतेच्या पालख्या आणि पारंपरिक सोंगे ही खास वैशिष्ट्ये आहेत.

Web Title: Holi 2026 traditions behind celebrating holi festival in various states

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • holi

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध
2

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
3

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
4

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.