Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baglamukhi Devi: कोर्ट-कचेरीतील अडथळे दूर करणारी शक्ती, बगलामुखी देवीचे काय आहे महत्त्व जाणून घ्या

दैनंदिन जीवनात कधी कधी कोर्ट-कचेरीचे वाद, शत्रूंचे त्रास किंवा अचानक निर्माण झालेल्या अडचणींमुळे मानसिक ताण वाढतो. दशमहाविद्यांपैकी एक मानली जाणारी ही बगलामुखी देवी. वाद-विवादात विजय मिळवून देणारी शक्ती म्हणून ओळखली जाते

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 28, 2026 | 01:00 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • कोण आहे बगलामुखी देवी
  • बगलामुखी देवीचे महत्त्व
  • बगलामुखी देवीचे स्वरुप
 

जीवनात कधी कधी अशी वेळ येते की कोर्ट-कचेरीचे प्रकरण, वाद-विवाद, शत्रूंचे कारस्थान किंवा अनपेक्षित अडथळे यामुळे मानसिक ताण वाढतो आणि आत्मविश्वास कमी होऊ लागतो. दशमहाविद्यांपैकी एक मानली जाणारी ही देवी शत्रूंना स्तब्ध करणारी, विरोधकांची वाचा आणि बुद्धी नियंत्रित करणारी शक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. बगलामुखी देवीचे महत्त्व जाणून घ्या

कोण आहे बगलामुखी देवी

हिंदू धर्मातील दशमहाविद्यांपैकी आठवी आणि अत्यंत शक्तिशाली म्हणजे माता बगलामुखी देवी. शत्रूंचा नायनाट करणारी नकारात्मक ऊर्जा संपुष्टात आणणारी देवी अशी तिची ओळख. बगला या शब्दाचा अर्थ लगाम लावणे किंवा एखादी क्रिया थांबवणे. तर मुखी याचा अर्थ चेहरा असा होतो. म्हणूनच शत्रूंच्या वाईट चालीवरती लगाम लावण्याचं काम ही देवी करते असं मानलं जाते. बगलामुखी देवीचा रंग सुवर्णासारखा पिवळा आहे त्यामुळे या देवीला पितांबरी अस देखील म्हणतात. देवीचे वस्त्र, प्रसाद आणि तिचं आसन सगळी गोष्ट पिवळ्या रंगांत असते. देवीला पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे म्हणूनच देवीच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगांचा उपयोग केला जातो. देवीची उपासना करताना साधकाने पिवळे वस्त्र परिधान केले पाहिजे, अशी देखील येथील रित आहे.

Holi 2026: सुख-समृद्धीसाठी होळीला तुमच्या राशीनुसार निवडा कपड्यांचा रंग, नशिबाची मिळेल साथ

बगलामुखी देवीचे स्वरुप

हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील बाळकंडी मंदिर आणि मध्य प्रदेशातील नलखेडा येथील बगलामुखी मंदिर ही अत्यंत जागृत असे स्थान मानले जातात. श्री बगलामुखी देवीचे मंदिर कांगडा जिल्ह्यातील बनखंडी गावामध्ये आहे. पांडू लिपीमध्ये देवीचे जसे वर्णन केले आहे त्याच स्वरुपात देवी येथे विराजमान आहे. देवीचं हे मंदिर महाभारत काळातील आहे. द्वापार युगामध्ये पांडवांनी अज्ञात वासात असताना एका रात्रीत हे मंदिर बांधले आणि पूजा अर्चा केली. या मंदिरात प्रथम अर्जुन आणि भीम यांना युद्धकलेत यशप्राप्ती होण्यासाठी देवीची उपासना केली होती. शत्रूनाशी देवी बगलामुखी मंदिरामध्ये विविध प्रकारच्या त्रासांच्या निवारणासाठी शत्रूंना शवन करून घेतले जाते. देवीच्या मंदिरामध्ये हवन केल्याने इच्छित फलप्राप्ती होते असेदेखील म्हणतात.

Yuti Drishti Yog: सूर्य-शनि योगामुळे या राशीच्या लोकांनी आर्थिक आणि करिअरमध्ये घ्यावी विशेष काळजी

बगलामुखी देवी महत्त्व

पुराणात अनेक ठिकाणी बगलामुखी देवीचे संदर्भ आढळतात. त्यापैकी एक म्हणजे एकदा दानवाने ब्रम्ह देवांचा ग्रंथ चोरून पाताळात लपवून ठेवला. त्याला पाण्यामध्ये मनुष्य किंवा देवता मारू शकणार नाहीत अस वरदान होतं. अशा वेळी ब्रम्हदेवांनी देवी भगवतीची उपासना केली आणि यातून श्रीबगलामुखी देवी अवतरली. देवीने बगळ्याचे रुप धारण करून त्या दानवाचा वध केला आणि ब्रम्हदेवाला त्यांचा ग्रंथ परत केला. तर दुसरा संदर्भ असा सत्ययुगात एकदा सृष्टीत भयंकर असं वादळ आलं. या वादळाला शांत करण्यासाठी भगवान श्री विष्णूने तपश्चर्या करून श्री बगलामुखी देवीला प्रसन्न करून घेतलं. तर लंकेवर विजय मिळविण्यासाठी श्री रामांनी देखील शत्रूनाशी श्री बगलामुखी देवीचे पूजन केलं होतं आणि त्यामुळेच त्यांना विजय प्राप्त झाला आणि म्हणूनच कोर्ट कचेरी, वादविवाद आणि गुप्त शत्रूंपासून संरक्षण मिळविण्यासाठी या देवीची साधना केली जाते. या महाविद्या देवीची उपासना रात्रीच्या वेळी केल्याने विशेष सिद्धी प्राप्त होते, असे देखील म्हणतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: बगलामुखी देवी कोण आहे?

    Ans: बगलामुखी देवी या दशमहाविद्यांपैकी एक मानल्या जातात. त्या शत्रूंची वाचा, बुद्धी आणि शक्ती स्तब्ध करणारी देवी म्हणून ओळखल्या जातात.

  • Que: कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात बगलामुखी उपासनेचे महत्त्व काय?

    Ans: श्रद्धेनुसार, देवीची उपासना केल्याने वाद-विवादात विजय मिळवण्याची क्षमता वाढते, विरोधकांचा प्रभाव कमी होतो आणि आत्मविश्वास दृढ होतो.

  • Que: बगलामुखी देवीला “पीतांबरा” का म्हणतात?

    Ans: तिच्या पूजेत पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. पिवळे वस्त्र, हळदीची माळ आणि पिवळ्या फुलांनी पूजा केली जाते, म्हणून त्यांना पीतांबरा असेही संबोधले जाते.

Web Title: Who is baglamukhi devi and what is her significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा
1

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा

Janmashtami Dream Meaning: स्वप्नात श्रीकृष्ण बासरी वाजवताना पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या
2

Janmashtami Dream Meaning: स्वप्नात श्रीकृष्ण बासरी वाजवताना पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या

Monthly Horoscope: सप्टेंबर महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या
3

Monthly Horoscope: सप्टेंबर महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Shukra Gochar: तूळ राशीत शुक्राचा प्रवेश; या राशींनी राहावे सावध, ज्योतिषांनी सांगितले उपाय
4

Shukra Gochar: तूळ राशीत शुक्राचा प्रवेश; या राशींनी राहावे सावध, ज्योतिषांनी सांगितले उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.