फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये धन, वैभव आणि समृद्धीचे देव मानले जाणारे कुबेर देव याला यक्षांचा राजा असेही म्हटले जाते. कुबेर देवाचा विशेष राशीच्या लोकांवर आशीर्वाद असतो अशा लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. हे लोक आर्थिकदृ्ष्ट्या मजबूत नसले तरी समाजामध्ये या लोकांचा आदर आणि प्रतिष्ठा वाढलेली असते.
ज्योतिषशास्त्रात अशा काही राशींचा उल्लेख केलेला आहे ज्या कुबेर देवाच्या प्रिय राशी मानल्या जातात. ज्या राशींच्या लोकांवर कुबेर देवाचा आशीर्वाद नसतो पण त्या लोकांना नशिबाची साथ मिळते. व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्या लोकांना जीवनामध्ये स्थिरता आणि समृद्धी देखील मिळते. कोणत्या राशींच्या लोकांवर कुबेर देवाचा आशीर्वाद असतो, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांचा स्वभाव शांत, स्थिर आणि समर्पित असतात. या राशीचा स्वामी शुक्र असल्याने धन, सौंदर्य आणि भौतिक सुखांचे प्रतिनिधित्व करतो. वृषभ रास भगवान कुबेराची प्रिय रास मानली जाते. या लोकांमध्ये आर्थिक स्थिती मजबूत असते. या लोकांना पैसे कमावण्यासोबतच त्यात वाढ करण्याचे देखील माहीत असते. व्यवसाय, रिअल इस्टेट, बँकिंग क्षेत्राशी संबंधित असलेले लोक प्रगती करतात.
कर्क राशीचे लोक भावनिक आणि संवेदनशील असतात. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. ही रास भगवान कुबेरांना अतिशय प्रिय मानली जाते. कुबेराच्या कृपेमुळे या लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. समाजामध्ये त्यांची प्रतिष्ठा वाढलेली असते. या लोकांना पैसेच नाही तर आदर आणि स्वाभिमान देखील मिळतो. या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असते.
तूळ राशीच्या लोकांचे आकर्षणाचे चिन्ह मानले जाते. कुबेर देवाला तूळ रास देखील प्रिय आहे. या लोकांनी कठोर मेहनत घेतल्यास त्यांनी ठरवलेले ध्येय त्यांना साध्य करता येईल. हे लोक कला, डिझाइन, फॅशन, न्याय आणि सल्लागार सेवांमध्ये खूप यशस्वी होतात. या लोकांचे उत्पन्नाच स्त्रोत स्थिर होतील.
धनु राशीचे लोक धाडसी आणि धार्मिक स्वभावाचे असतात. या राशीच्या लोकांना गुरुच्या प्रभावाखाली असल्याने या लोकांची विचारसरणी उच्च आणि श्रद्धेची असते. कुबेर देवाच्या कृपेने या लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. या लोकांना जास्त संपत्ती देखील मिळते. या लोकांना कामाच्या ठिकाणी हुशारीने काम करावे लागेल. या लोकांना नशिबाची साथ लाभेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)