Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sant Tukaram Maharaj beej: संत तुकाराम बीज म्हणजे काय? जाणून घेऊया महत्त्व आणि कसा साजरा होतो हा सोहळा

वारकरी सांप्रदायातील संत तुकाराम महाराज हे विचारवंत, समाजसेवक आणि कवी सुद्धा होते. संत तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हणून ओळखले जाते. संत तुकाराम बीज म्हणजे काय? कसा साजरा केला जातो हा सोहळा जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 05, 2026 | 10:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • संत तुकाराम बीज सोहळा कधी आहे
  • संत तुकाराम बीज सोहळा म्हणजे काय
  • संत तुकाराम बीज सोहळ्याचे आयोजन
 

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांपैकी एक म्हणजे संत तुकाराम महाराज होय. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांमधून आपल्याला प्रेरणा मिळते. तुकाराम महाराज यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत. संत तुकाराम काळाच्या पुढचा विचार मांडणारे सत्यशोधक विचारांचे संत होते. त्यांच्या अभंगाना व्यावहारिकतेची जोड होती. त्यांनी सामान्य माणसाच्या जगण्यातील विचार साहित्यात मांडले. संत तुकाराम हे एक वारकरी, संत होते. संत तुकाराम यांचा जन्म देहू गावात झाला. संत तुकाराम यांना ‘जगद्गुरू’ म्हणून ओळखले जाते. वारकरी सांप्रदयासाठी त्यांनी केलेले काम उल्लेखणीय आहे. पण तुकाराम बीज म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात या संदर्भात थोडक्यात माहिती.

संत तुकाराम बीज सोहळा कधी आहे

संत तुकाराम बीज सोहळा गुरुवार, 5 मार्च रोजी पुणे जिल्ह्यातील देहू येथे साजरा केला जाणार आहे. हा सोहळा फाल्गुन वद्य द्वितीयेला साजरा केला जातो. हा सोहळा ३७८ वी पुण्यतिथी तिथी म्हणून हा सोहळा साजरा करण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावर्षी हा सोहळा लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत, देहूतील वैकुंठस्थान मंदिर आणि गाथा मंदिरात होणार आहे.

Surya Nakshatra Parivartan: सूर्याचा मार्च महिन्यात तीनदा नक्षत्र बदल, या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी

तुकाराम बीज म्हणजे काय?

संत तुकारामांच्या जन्म वर्षाबाबत अनेक मतांतरे आहेत. संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. तर फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले असे मानले जाते. म्हणजेच संत तुकाराम यांना देव सदेह वैकुंठी घेऊन गेल्याची श्रद्धा आहे. या दिवसालाच ‘तुकाराम बीज’ म्हणून संबोधले जाते.फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी संत तुकाराम महाराज यांनी सदेह वैकुंठ गमन केले. मात्र, संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले की नाही? याबाबत मतमतांतरे आहेत.

संत तुकाराम सोहळ्याचे आयोजन

संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत, कवी होते. संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून आणि कीर्तनांतून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम केले. संत तुकाराम बीजच्या दिवशी भाविक हे तुकाराम महाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात, नमन तसेच अभिवादन करतात. यंदा 5 मार्च रोजी ‘तुकाराम बीज’ म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस आहे.

zodiac sign: सिद्धी योग आणि हस्त नक्षत्रामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदा

नांदुरकी वृक्षाचे महत्त्व

संत तुकाराम यांचे देहू या आपल्या जन्म गावातच वैकुंठ गमन केले. त्या परिसरात एक मंदिर आहे. याच मंदिराच्या शेजारी एक नांदुरकी वृक्ष आहे. असे म्हटले जाते की, तुकाराम महाराज यांनी आपला देह ठेवण्यासाठी पांडुरंगाचे नामस्मरण केले. हे नामस्मरण त्यांनी नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली केले. तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन हे ग्रामस्थांच्या समोर झाले आणि तेव्हापासून ग्रामस्थ या नांदुरकी वृक्षासमोर नतमस्तक होतात. इतकेच नाही तर तुकाराम बीजच्या दिवशी हा नांदुरकी वृक्ष हलतो अशी अनेकांची धारणा आहे. या दिवशी भाविक मोठ्या संख्येने देहू येथे दर्शनासाठी येतात. विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: संत तुकाराम बीज म्हणजे काय?

    Ans: संत तुकाराम महाराजांनी देहूत वैकुंठगमन केले, त्या दिवसाची स्मृती म्हणून साजरी केली जाणारी पुण्यतिथी म्हणजे संत तुकाराम बीज.

  • Que: हा सोहळा कुठे साजरा केला जातो?

    Ans: मुख्य सोहळा महाराष्ट्रातील देहू येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच राज्यातील विविध ठिकाणी वारकरी संप्रदायात हा दिवस विशेष मानला जातो.

  • Que: संत तुकाराम बीज कशी साजरी केली जाते?

    Ans: पालखी सोहळा, अभंग गायकरी आणि कीर्तन भजन-कीर्तन कार्यक्रम, दिंडी मिरवणूक, विठ्ठल नामस्मरण

Web Title: Sant tukaram maharaj beej ceremony 2026 importance and how this festival is celebrated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • dharm
  • Hindu Festival
  • Saint Tukaram Maharaj

संबंधित बातम्या

Rishi Panchami Wishes: श्रद्धा आणि भक्तीचा पवित्र सण ऋषीपंचमी! प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा
1

Rishi Panchami Wishes: श्रद्धा आणि भक्तीचा पवित्र सण ऋषीपंचमी! प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
2

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Varaha Avatar: श्रीहरींचा वराह अवतार का झाला? नाकावर पृथ्वी उचलण्यामागची कथा जाणून घ्या
3

Varaha Avatar: श्रीहरींचा वराह अवतार का झाला? नाकावर पृथ्वी उचलण्यामागची कथा जाणून घ्या

Hartalika: हरतालिकेचे व्रत म्हणजे काय? माता पार्वतीने शंकरांना मिळविण्यासाठी केलेले व्रत
4

Hartalika: हरतालिकेचे व्रत म्हणजे काय? माता पार्वतीने शंकरांना मिळविण्यासाठी केलेले व्रत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.