फोटो सौजन्य- pinterest
मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या सणाला लोक पतंगही उडवतात. मकर संक्रांती ही पीकांना उपयुक्त आणि प्रभावी संसाधने देऊन आशीर्वाद दिल्याबद्दल सूर्यदेवाचे आभार मानण्यासाठी साजरी केली जाते. हा सण देशभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. पण तो साजरा करण्यामागचा प्रत्येकाचा उद्देश एकच असतो.
मकर संक्रांतीच्या दिवशी, लोक गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये डुबकी घेतात कारण त्यांचा विश्वास आहे की यामुळे मानवी पाप धुऊन त्यांना समृद्धी आणि संसाधनांनी भरलेले नवीन जीवन मिळेल. या दिवशी, लोक स्वादिष्ट अन्न तयार करतात आणि त्यांच्या घराच्या गच्चीवरून पतंग उडवून एकत्रितपणे उत्सवाचा आनंद घेतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छाही कॉल किंवा मेसेजद्वारे देतात.
नवीन वर्षाचा पहिला वहीला आणि गोड-धोड सण म्हणजे मकर संक्रांत होय. यंदा आज मंगळवार 14 जानेवारी रोजी, मकर संक्रांती सण साजरा केला जात आहे. सूर्याचे मकर राशीत परिवर्तन होणे या स्थितीला मकर संक्रांती म्हणून ओळखले जाते. सूर्य उत्तरेकडे वळतो यामुळे याला उत्तरायण असेही म्हटले जाते.
मकर संक्रांतीचा सण तुमच्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येवो.
प्रत्येक दिवस तुमच्या जीवनात नवीन उत्साह आणि यश घेऊन येवो.
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
आंघोळीपासून झोपेपर्यंत लड्डू गोपाळांची कशी घ्यावी काळजी, जाणून घ्या
ही मकर संक्रांत, तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांतीचा प्रकाश पसरो.
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
वर्षाचा पहिला सण करा भरभरून साजरा,
तिळात गूळ मिसळा आणि जिभेवर येऊ द्या गोडवा,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मांजा, चक्री, पतंगीची काटाकाटी, हलवा,
तिळगुळ, गुळपोळी, संक्रांतीची लज्जत न्यारी.
पतंग उडवायला चला रे
जीवनात हास्य भरा रे
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
मकर संक्रांतीचा सण तुमचे जीवन नवीन ऊर्जा आणि उत्साहाने भरून जावो.
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
बेडरूमशी संबंधित वास्तू दोषांमुळे पती-पत्नीमधील वाढू शकतात भांडणे
तिळात मिसळला गूळ,
त्याचा केला लाडू
मधूर नात्यासाठी गोड गोड बोलू,
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
या शुभ दिवशी तुम्ही आकाशातील पतंगांप्रमाणे उंच भरारी घ्या.
तुमची स्वप्ने उडू दे आणि नवीन उंची गाठू दे.
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
आठवण सुर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मणभर प्रेम,
गुळाचा गोडवा,
ऋणानुबंध वाढवा
तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तीळ आणि गुळाच्या गोडव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात गोडवा आणि प्रेम राहो
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
पतंगाप्रमाणेच तुमची स्वप्नेही आकाशाला भिडतील
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या स्वप्नांना पतंगाप्रमाणेच भरारी मिळू दे
शांत, समाधान आणि प्रेमपूर्वक आयुष्य तुम्हाला लाभू दे,
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
जसा सूर्य उत्तरेकडे आपला प्रवास सुरू करतो,
तो तुमचे जीवन प्रेमाच्या उबदारपणाने आणि यशाच्या तेजाने भरेल
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा