Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीनंतर लहान मुलांचं बोरन्हाण का केलं जातं? जाणून घ्या धार्मिक आणि शास्त्रीय कारणे

मकरसंक्रांती हा केवळ तिळगुळाचा किंवा पतंगांचा सण नसून त्यामागे अनेक परंपरा आहेत. घरामध्ये लहान मुलांचं बोरन्हाण केलं जातं. लहान मुलांचं बोरन्हाण करण्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारणे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 11, 2026 | 03:43 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • मकरसंक्रांत कधी आहे
  • मकरसंक्रांतीनंतर लहान मुलांचं बोरन्हाण का केलं जातं
  • बोरन्हाण करण्यामागील धार्मिक आणि सामाजिक कारणे
 

नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. यंदा मकरसंक्रांत 14 जानेवारीला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मकरसंक्रांतीमध्ये बोरन्हाण हे महाराष्ट्रात विविध नावाने प्रचलित आहे, तर विदर्भात त्याला लहान मुलांची लूट या नावाने प्रचलित आहे तर काही ठिकाणी बोरलूट असंही म्हणतात. ही परंपरा आजही साजरी करण्यात येते. बोरन्हाण म्हणजे काय, कधी साजरे केले जाते, काय आहे त्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारणे जाणून घ्या

बोरन्हाण म्हणजे काय?

नववधूची पहिली मकरसंक्रांत असली की, तिला हलव्याचे दागिने घातले जातात. तसेच बोरन्हाणच्या सोहळ्यात लहान मुलांना हलव्याच्या दागिन्यांनी नटवलं जातं. त्याचं औक्षण करून त्याच्या डोक्यावरून बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या आदी पदार्थ टाकले जातात. हे पदार्थ उपस्थित लहान मुलं लुटतात. यावेळी इतर लहान मुलांचा आनंद अवर्णनीय असतो. या विधीला बोरन्हाण असं म्हटलं जातं.

बोरन्हाण करण्यामागील आख्यायिका

लहान मुलांचं बोरन्हाण का करायचे यामागे एक पौराणिक कथा आहे. अस म्हणतात की, करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये म्हणून हा विधी करण्यात येतो. हा विधी सर्वप्रथम करी राक्षसापासून बचावासाठी बाळ गोपाळ कृष्णावर करण्यात आला होता. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे. लहान मुलं हे कृष्णाचं रुप मानलं जातं. त्यामुळे करी राक्षसाची सावली आपल्या मुलावर पडू नये, म्हणून बोरन्हाण करण्याची परंपरा सुरू झाली.

आरोग्यदायी बोरन्हाण

बोरन्हाणमागे धर्मशास्त्राबरोबरच आरोग्यवर्धक कारणही आहे. मकरसंक्रांत ही ऋतू बदलाची चाहुल आहे. लहान मुलांना या बदलत्या ऋतुचा त्रास होऊ नये आणि या ऋतुमधील फळे त्यांनी खावीत म्हणून हा विधी केला जातो. मजा आणि मस्तीमध्ये जी लहान मुलं न खाणारी फळे ही या निमित्ताने खातात. त्यामुळे त्यांना त्यातील जीवनसत्त्वे मिळतात.

Makar Sankranti 2026: हिंदू सणांमध्ये काळा रंग अशुभ, पण मकरसंक्रांतीला का मानला जातो शुभ

बोरन्हाणं कधी आणि किती वर्षांपर्यंतच्या मुलाचं करावं?

मकरसंक्रांत आली की, लहान मुलांना बोरन्हाण करण्याची परंपरा आहे. मकरसंक्रांतीच्या करीदिन हे बोरन्हाणासाठी योग्य दिवस मानला गेला आहे. पण तुम्ही रथ सप्तमीपर्यंत हा सोहळा कधीही करू शकता तर एक वर्षांच्या चिमुकल्यापासून पाच वर्षांच्या मुलांचं बोरन्हाण करतात. लहान मुलांचा कौतुक सोहळा आजकाल मोठ्या थाट्यामाट्यात केला जातो.

कसं घालायचं बोरन्हाणं?

घरात तुम्ही ज्या ठिकाणी बोरन्हाण करणार आहात ती जागा स्वच्छ करुन तिथे पाट किंवा चौरंग ठेवा. बाळाला नवीन काळ्या रंगाचे कपडे घालून त्यांना हलव्याचे दागिने घाला आणि चौरंगावर बसवा. त्यानंतर चिमुकल्याच औक्षण करा. त्याच्या डोक्यावरून बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा आणि कुरमुरे एकत्र करुन त्याचं बोरन्हाण करा आणि उपस्थितीत लहान मुलांना ते लुटण्यासाठी सांगा. बोरन्हाणमध्ये वापरण्यात येणारी फळं मुलं इतर वेळी खात नाहीत म्हणून बोरन्हाणच्या माध्यमातून ती फळं त्यांच्या पोटात जातात.

बोरन्हाणंचं नवं रूप

हल्ली वाढदिवस, बारशे व अन्य कोणतेही सोहळे भव्य दिव्य करण्यासाठी हल्ली पालक वाटेल ते करतात. काही जण हा सोहळा करण्यासाठी खास ऑडर करतात. त्यात विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण बोरन्हाण करताना लहान मुलांना डोक्याला किंवा अंगाला लागू नये म्हणून काळजी आपण घेतली पाहिजे. यासाठी छान छोटीशी छत्री वापरु शकता. या बोरन्हाणंमध्ये तुम्ही चुरमुरे, लाह्या, छोटी बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, रंगीबेरंगी गोळ्या, हल्लीच्या लहान मुलांच्या आवडीचा विचार करून वेगवेगळी चॉकलेट्स, गोळ्या, बिस्कीटे वापरु शकता.

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करा या गोष्टी, जीवनात येईल सुख समृद्धी

यावेळी काही श्लोक येत असतील ते म्हटले तरी अति उत्तम, तसेच जमलेल्या आप्तेष्टांनी बाळावर प्रेमाचा, शुभेच्छांचा वर्षाव करावा. तो सुबत्तेत न्हाउ दे. कायम बाळगोपाळांनी घेरलेला म्हणजेच सर्वांचा लाडका होऊ दे, असा हा लहान मुलांचा मकरसंक्रांतीमधील एक संस्कार आहे. प्रत्येक लहान मुलांच्या घरी आवर्जून करावा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: बोरन्हाण म्हणजे काय

    Ans: बोरन्हाण हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक विधी आहे. मकरसंक्रांतीनंतर लहान मुलांना किंवा नवजात बाळांना बसवून त्यांच्या अंगावर बोर (बेर), ऊस, भुईमूग, तीळ, हरभरे, साखरगाठी अशा नैसर्गिक पदार्थांचा वर्षाव केला जातो. हा विधी आनंद, संरक्षण आणि आशीर्वादाचे प्रतीक मानला जातो.

  • Que: मकरसंक्रांतीनंतरच बोरन्हाण का केलं जातं?

    Ans: मकरसंक्रांतीनंतर सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो. या काळात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आरोग्यास पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे संक्रांतीनंतर बोरन्हाण करणे शुभ मानले जाते.

  • Que: बोरन्हाण कोणत्या वयाच्या मुलांचं केलं जातं?

    Ans: साधारणपणे नवजात बाळापासून 5–7 वर्षांपर्यंतच्या मुलांचं बोरन्हाण केलं जातं. विशेषतः पहिल्यांदा संक्रांती अनुभवणाऱ्या बाळासाठी हा विधी महत्त्वाचा मानला जातो.

Web Title: Makar sankranti 2026 why bor nahan ritual is done for children religious and scientific reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • Makar Sankranti

संबंधित बातम्या

Makar Sankranti 2026: हिंदू सणांमध्ये काळा रंग अशुभ, पण मकरसंक्रांतीला का मानला जातो शुभ
1

Makar Sankranti 2026: हिंदू सणांमध्ये काळा रंग अशुभ, पण मकरसंक्रांतीला का मानला जातो शुभ

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करा या गोष्टी, जीवनात येईल सुख समृद्धी
2

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करा या गोष्टी, जीवनात येईल सुख समृद्धी

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला तीळगूळ का दिला जातो? काय आहे यामागील धार्मिक आणि सामाजिक कारणे
3

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला तीळगूळ का दिला जातो? काय आहे यामागील धार्मिक आणि सामाजिक कारणे

Bhishma Pitamah: मकरसंक्रांतीच्या दिवशी भीष्म पितामहांनी का सोडले प्राण? काय आहे कथा
4

Bhishma Pitamah: मकरसंक्रांतीच्या दिवशी भीष्म पितामहांनी का सोडले प्राण? काय आहे कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.