फोटो सौजन्य- pinterest
भारतात सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. कारण प्रत्येक उत्सव जीवनात उत्साह निर्माण करतात. आळस, मरगळ झटकून नवचैतन्य देतात. प्रत्येक सणात विशिष्ट पोषकाची परंपरा आहे. हल्ली नवरात्रोत्सवात तर विविध रंगांचे कपडे घालण्याची नवीन परंपरा रूजू झाली आहे. त्यात काही गैर नाही. पण त्यातही कुठेही काळा रंग येत नाही. तसं म्हटलं तर हिंदू धर्मात काळा रंग निषेधार्थच किंवा अशुभच मानला आहे. पण मकरसंक्रांतीच्या दिवशी मात्र काळ्या रंगाची साडी, वस्त्र परिधान करण्याची परंपरा आहे. ही नेमकी काय आहे. यामागे काय शास्त्र आहे. हिंदू सणांमध्ये काळा रंग अशुभ, पण मकरसंक्रांतीला का मानला जातो शुभ काय आहे यामागील कारण जाणून घ्या
सामान्यतः हिंदू धर्मात कोणतेही सण-उत्सव, व्रत किंवा पूजा-पाठाच्या वेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते. काळा रंग दुःख, नकारात्मकता आणि अडथळ्यांचे प्रतीक मानला जातो. मात्र, मकरसंक्रांती हा असा एकमेव सण आहे, ज्यादिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणे सांगितली जातात.
सनातन धर्मात मकरसंक्रांतीचा सण अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात. सूर्यदेवांच्या या संक्रमणामुळे उत्तरायणास सुरुवात होते. या दिवशी सूर्यपूजा, गंगा व इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान तसेच दानधर्माला विशेष महत्त्व असते. यंदा बुधवार, 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांतीचा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
देशभरात हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. उत्तर भारतात याला खिचडी, पंजाबमध्ये लोहडी तर दक्षिण भारतात पोंगल म्हणून ओळखले जाते. या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनि देवाच्या मकर राशीत प्रवेश करतात. ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंग हा शनि देवाशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यास शनि देवाची कृपा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात मकरसंक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालण्याची परंपरा आहे.
मकरसंक्रांती हा ऋतूबदलाचा सण मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी थंडी अधिक असते. काळा रंग उष्णता अधिक प्रमाणात शोषून घेतो, त्यामुळे शरीराला उब मिळते. म्हणूनच थंडीपासून संरक्षणासाठीही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मकरसंक्रांती हा सूर्यदेवाच्या उत्तरायण प्रवासाची सुरुवात दर्शवणारा सण आहे. या काळात हिवाळा तीव्र असतो. काळा रंग उष्णता शोषून घेतो, त्यामुळे शरीर उबदार राहते. म्हणून मकरसंक्रांतीला काळ्या कपड्यांना शुभ मानले जाते.
Ans: मान्यतेनुसार काळा रंग नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी काळे कपडे परिधान केल्याने वाईट ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते, असे मानले जाते.
Ans: काळ्या साडी किंवा ड्रेससोबत सोनेरी दागिने, हिरवी बांगडी, हळदी-कुंकू लावणे शुभ मानले जाते. यामुळे सौभाग्य आणि समृद्धी वाढते अशी श्रद्धा आहे.






