फोटो सौजन्य- pinterest
शुक्रवार, 18 जुलै रोजी चंद्र मंगळाच्या मेष राशीत संक्रमण करणार आहे. आजचा शुक्रवार दिवस असल्याने शुक्र हा दिवसाचा स्वामी ग्रह असेल. त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यामध्ये नवम पंचम योग तयार होणार आहे. शुक्र चंद्रापासून दुसऱ्या घरात असल्याने सुनाफ योग तयार होईल. ग्रहांप्रमाणेच नक्षत्रांमध्ये देखील परिणाम होताना दिसून येतील. अश्विनी नक्षत्रामध्ये सुकर्मा आणि धृतिमान योगाची युती देखील तयार होणार आहे. इतकेच नाही तर, शुक्र त्याच्या मूलत्रिकोण राशी वृषभ राशीत भ्रमण करणार आहे, ज्यामुळे मालव्य राज योग तयार होईल. मालव्य राजयोग आणि देवी लक्ष्मीच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी, जाणून घ्या
शुक्रवारचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी चांगला राहणार आहे. आज तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तुम्ही तुमच्या कामाबद्दल गंभीर असाल आणि तुमच्या कष्टाचे फळ मिळेल. व्यवसाय आणि नोकरीमध्ये तुमचे म्हणणे गांभीर्याने ऐकले जाईल आणि समजले जाईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
वृषभ राशीच्या लोकांचा आजचा शुक्रवारचा दिवस चांगला राहणार आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला अधिक खर्च करावा लागू शकतो. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स, पॅथॉलॉजी, कॉस्मेटिक्स इत्यादींमध्ये काम करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नोकरी करणारे लोक त्यांचे ध्येय साध्य करु शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना यश मिळेल. सरकारी संबंधित असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवारचा दिवस फायदेशीर राहणार आहे. तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. जे लोक व्यवसायात भागीदारीमध्ये काम करत आहेत अशा लोकांना फायदा होऊ शकतो. तुमची नियोजित कामे पूर्ण होऊ शकतात. नातेसंबंध चांगले राहील.
मकर राशीच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस खूप खास असणार आहे. रिअल इस्टेट आणि प्रॉपर्टीमध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. वाहतुकीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)