
फोटो सौजन्य- pinterest
मंगळ हा धैर्य, आत्मविश्वास, शौर्य आणि संपत्तीचा ग्रह मानला जातो. मंगळाचे भ्रमण विशिष्ट राशीच्या लोकांवर परिणाम करते. यावेळी मंगळाचे हे संक्रमण रविवार, 7 डिसेंबर रोजी होणार आहे. या काळात काही राशीच्या लोकांना सुवर्णकाळाच्या संधी मिळणार आहेत. मंगळ ग्रह धनु राशीत संक्रमण करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु राशीत मंगळाचे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. मंगळाच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या
ज्योतिष और पंचांगानुसार, रविवार, 7 डिसेंबर रोजी रात्री 8.27 वाजता मंगळ ग्रहाचे संक्रमण होणार आहे. मंगळाचे हे संक्रमण वृश्चिक राशीतून धनु राशीत होणार आहे. पृथ्वीपुत्र मंगळाच्या धनु राशीत प्रवेशामुळे कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे संक्रमणाचे सकारात्मक परिणाम जाणवतील. या काळात तुमचे नातेसंबंध दृढ होतील. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हा काळ चांगला राहील, ज्यामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. शेअर बाजार तुम्हाला आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतो. एखादा नवीन प्रकल्प किंवा व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे.
मंगळाचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येणारा राहील. सिंह राशीच्या लोकांना अध्यात्माकडे जास्त कल असेल. तुम्हाला करिअरमधील प्रगतीचा फायदा होईल. व्यवसायात असलेल्यांना फायदा होईल. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक मजबूत होईल. मालमत्तेसंबंधित कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.
या काळात तूळ राशीच्या लोकांमधील आदर आणि सन्मान वाढेल. मंगळाच्या संक्रमणामुळे प्रगती आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना फायदा होईल. व्यवसायात तुम्हाला फायदा होईल आणि तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. मंगळाचे हे संक्रमण तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही नवीन योजना आखल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मंगळ ग्रह 7 डिसेंबर रोजी संक्रमण करणार आहे
Ans: रविवार, 7 डिसेंबर रोजी रात्री 8.27 वाजता मंगळ ग्रहाचे संक्रमण होणार आहे.
Ans: मंगळ ग्रहाच्या संक्रमणाचा मिथुन, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांना फायदा होणार आहे