फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात गणपती बाप्पाला पूजनीय देवता मानली जाते. त्यांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे आणि त्यांना “विघ्नहर्ता या नावाने देखील ओळखले जाते. ज्याचा अर्थ सर्व अडथळे दूर करणारा आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत पाळले जाते. पंचागानुसार मार्गशीर्ष महिन्यातील विनायक चतुर्थीचे व्रत सोमवार, 24 नोव्हेंबर रोजी पाळले जाणार आहे.
असे मानले जाते की या दिवशी योग्य विधींनी गणपती बाप्पाची पूजा केल्याने आणि विशेषतः रात्री काही चमत्कारिक उपाय केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि सुख-समृद्धी येते. विनायक चतुर्थीच्या रात्री कोणते उपाय केल्याने तुम्हाला फायदा होणार आहे ते जाणून घ्या
जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक समस्यांना तोंड देत असाल किंवा तुमचा पैशाचा प्रवाह बंद झाला असेल तर हा उपाय करणे खूप प्रभावी आहे. हा उपाय करण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी रात्री पूजा झाल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी मातीच्या दिव्यात शुद्ध गायीचे तूप टाका. या दिव्यामध्ये चार लवंग टाकून तो पेटवा. दिवा लावताना गणपती बाप्पाजवळ दुर्वा अर्पण करा आणि ‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करा. श्रद्धेनुसार हा उपाय केल्याने गरिबीचा नाश करतो आणि संपत्ती मिळविण्याचे नवीन मार्ग उघडतो.
नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर हा उपाय करणे खूप फायदेशीर मानले जाते. विनायक चतुर्थीच्या रात्री घराच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ दोन तोंडी दिवा लावा. असे केल्याने घरामध्ये आनंद आणि शांती येते. तसेच सकारात्मक ऊर्जा प्रसारित होऊन नकारात्मक ऊर्जा दूर होते.
जर तुम्ही राहू आणि शनि दोषामुळे त्रस्त असाल किंवा कर्जामुळे तुमचे जीवन सतत अडचणीत येत असल्यास हे उपाय करणे खूप फायदेशीर ठरेल. विनायत चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी पिठाचा दिवा बनवा, त्यात मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल घ्या आणि पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा लावा. हा उपाय केल्याने राहू आणि शनिच्या दुष्परिणामांपासून आराम मिळतो. कर्जाशी संबंधित समस्याही दूर होतात आणि उत्पन्न वाढते.
पूजा करताना गणपती बाप्पाला शमीचे पान अर्पण करा. शमीच्या झाडाची पूजा केल्यानंतर हे पान अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. रात्री गणपती बाप्पासमोर बसून अथर्वशीर्षाचे पठण करावे त्यामुळे बुद्धिमत्ता, ज्ञान वाढते आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते. त्यानंतर बाप्पाला मोदक आणि लाडूचा नैवेद्य दाखवा. जीवनातील वारंवार येणाऱ्या त्रासांपासून सुटका मिळविण्यासाठी संकटनाशन गणेश स्तोत्राचे पठण करा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: विनायक चतुर्थी 24 नोव्हेंबर रोजी आहे
Ans: विनायक चतुर्थीला उपाय केल्याने आर्थिक प्रगती, स्पर्धा परीक्षा, व्यवसाय, करिअर, अडचणी इत्यादी फायदा होतो
Ans: विनायक चतुर्थी ही प्रत्येक महिन्यात येते. फाल्गुन, आषाढ, भाद्रपद आणि माघ महिन्यातील चतुर्थी शुभ मानली जाते






