फोटो सौजन्य- pinterest
पंचांगानुसार सोमवार, 28 जुलै रोजी मंगळ कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला अग्नि तत्वाचा क्रूर ग्रह मानले जाते. ज्याला धैर्य, ऊर्जा, लढाऊपणा आणि संघर्षाचे कारक देखील मानले जाते. या ग्रहामुळे व्यक्तीच्या जीवनात गतिमानता आणि शौर्य आणतो. त्यामुळे त्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनात आरोग्यावर, नातेसंबंधांवर आणि आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. एखाद्याच्या कुंडलीमध्ये मंगळाची स्थिती खूप महत्त्वाची असते. जर कुंडलीमध्ये मंगळ अशुभ असल्यास अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे तणाव, कौटुंबिक भांडणे, आरोग्य समस्या आणि आर्थिक नुकसान यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
ज्यावेळी मंगळ ग्रह आपली राशी बदलतो त्यावेळी त्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतो. हा बदल कधीकधी सकारात्मक असतो तर कधी आव्हानात्मक. सोमवार, 28 जुलै रोजी मंगळ कन्या राशीमध्ये आपले संक्रमण करणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक राहू शकतो तर काही लोकांना तणाव आणि संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. मंगळ ग्रहाच्या कन्या राशीत संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांवर कसा परिणाम होणार आहे ते जाणून घ्या
मंगळ ग्रहांचे कन्या राशीमध्ये होणारे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रासदायक असू शकते. या लोकांना अनपेक्षित खर्च येऊ शकतो. आरोग्याशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. कौटुंबिक जीवनात तणाव वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेण्याचे टाळावे कारण हा निर्णय तुमच्यासाठी चांगला राहणार नाही. जमीन, मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित कोणताही वाद उद्भवू शकतात.
मंगळ ग्रहांचे कन्या राशीमध्ये होणारे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी अशुभ असणार आहे. या लोकांना मानसिक ताणतणाव असू शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस कमी होईल. तुमच्या खर्चात अचानक वाढ होईल. मुलांशी संबंधित काही चिंता राहू शकतात. कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा.
मंगळ ग्रहांचे कन्या राशीमध्ये होणारे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी तणावपूर्ण राहील. तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक वातावरणात असंतोष राहू शकतो. खर्च वाढू शकतात. अनावश्यक खर्च करणे टाळा. काही जुन्या व्यवहारांबाबतही वाद निर्माण होऊ शकतात. या काळात तुम्हाला धीर धरणे आणि शहाणपणाने वागणे खूप महत्त्वाचे आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)