फोटो सौजन्य- pinterest
शनिवार, 13 सप्टेंबर रोजी रात्री 9.34 वाजता मंगळ कन्या राशी सोडून तूळ राशीमध्ये प्रवेश करेल आणि 26 ऑक्टोबर रोजी परत या राशीमध्ये येईल. मंगळाला ऊर्जा, धैर्य, शौर्य आणि परिश्रमाचे प्रतीक मानले जाते. या ग्रहाला सेनापती असे देखील म्हटले जाते. जो मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे. मंगळ मकर राशीमध्ये उच्च आहे. तर कर्क राशीत तो क्षीण आहे. शुक्र तूळ राशीचा स्वामी आहे आणि या राशीला मंगळासाठी प्रतिकूल मानली जाते. मंगळाचा आक्रमक स्वभाव आणि तूळ राशीची संतुलित ऊर्जा यामुळे कधीकधी संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. मंगळाचे हे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक असू शकते. कोणत्या राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी, जाणून घ्या
मंगळाचे हे संक्रमण मेष राशीच्या कुंडलीमध्ये सातव्या घरात होणार आहे. ज्याचा संबंध विवाह, नातेसंबंध आणि भागीदारीशी आहे. तूळ राशी शत्रू असल्याने जोडीदारासोबत मतभेद, गैरसमज आणि तणाव वाढू शकतात. या काळात व्यावसायिक भागीदारी दिसून येईल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्या गेल्यास पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. मंगळाच्या या स्थितीमुळे तुमच्यामधील आत्मविश्वास कमी होऊ शकतात.
कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे संक्रमण तुमच्या कुंडलीमध्ये चौथ्या घरात होत आहे. याचा संबंध घर, आई आणि मानसिक शांतीशी आहे. यावेळी कुटुंबात तणाव, आईशी मतभेद, मालमत्तेशी संबंधित वाद होण्याची शक्यता आहे. या काळात गृहप्रवेश सारख्या कामांमध्ये विलंब होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. आरोग्याच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात. फुफ्फुसे आणि हृदयाशी संबंधित समस्या ही उद्भवू शकते. कर्क राशीमध्ये मंगळाची स्थिती असल्याने तुम्हाला तीव्र परिणाम भोगावे लागतील.
तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे संक्रमण तुमच्या कुंडलीमध्ये पहिल्या घरात होणार आहे. याचा संबंध आरोग्य आणि आत्मविश्वासाशी संबंधित आहे. या काळामध्ये डोकेदुखी, रक्तदाब किंवा दुखापत होण्याचा धोका वाढू शकतो. ज्यामुळे वैवाहिक जीवनात किंवा व्यावसायिक भागीदारीत तणाव निर्माण होऊ शकतो. शुक्र आणि मंगळ यांच्यातील शत्रुत्वामुळे मानसिक आणि शारीरिक दबाव वाढू शकतो.
मकर राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे संक्रमण तुमच्या कुंडलीमध्ये दहाव्या घरात होत आहे. याचा संबंध करिअर आणि प्रतिष्ठेशी संबंधित आहे. मकर राशी ही मंगळाची उच्च रास असल्याने तूळ राशीमध्ये त्याचा कमकुवत प्रभाव दिसून येईल. नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला अधिक दबाव, वरिष्ठांशी मतभेद आणि स्पर्धेत अडचणी जाणवू शकतात. सांधेदुखी आणि थकवा यासारख्या समस्या देखील जाणवू शकतात.
मीन राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे संक्रमण तुमच्या कुंडलीमध्ये आठव्या घरात होत आहे. याचा संबंध बदल, रहस्य आणि अचानक घडणाऱ्या घटनांशी संबंधित आहे. या काळामध्ये आर्थिक नुकसान, खर्च, गुंतवणुकीत वाढ यांसारख्या समस्या येऊ शकतात. मानसिक ताण, चिंता आणि रक्त आणि स्नायूंशी संबंधित आजारामुळे तुम्हाला त्रास जाणवू शकतो. मंगळाच्या या स्थितीमुळे तुमची स्थिती नकारात्मक परिणाम देऊ शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)