Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम: महाकाली देवींचा वार्षिक भव्य यात्रोत्सव

शिरगाव, कुंभार्ली आणि पोफळी या तीन गावांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या श्री सुखाई वरदायिनी महाकाली या जागृत देवस्थानचा वार्षिक भव्य यात्रोत्सव बुधवार, १८ फेब्रुवारी रोजी कुंभार्ली येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 07, 2026 | 02:09 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • श्री सुखाई वरदायिनी महाकाली यात्रेची सुरुवात
  • श्री सुखाई वरदायिनी महाकाली यात्रा
  • यात्रोत्सवाची वैशिष्ट्ये 
तालुक्यातील शिरगाव, कुंभार्ली, पोफळी या तीन गावच्या श्री सुखाई वरदायिनी महाकाली या जागृत देवस्थानची यात्रा बुधवार १८ फेब्रुवारी रोजी कुंभार्ली येथे संपन्न होणार आहे. यावेळी धार्मिक कार्यक्रमांसह रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थानतर्फे देण्यात आली आहे. या देवींचा वार्षिक भव्य यात्रोत्सव म्हणजे तीन गावांसाठी आनंदाची पर्वणीच असते. तिन्ही गावे स्थानिकांसह चाकरमन्यांनी फुलून जातात. तर या यात्रोत्सवानिमित्त मंदिर विद्युत रोषणाई फुलांच्या आकर्षक सजावटीने सजवण्यात येते.

शिरगाव, कुंभार्ली, पोफळी ही तीन गावे एका कुटुंबाप्रमाणे नांदत आहेत. या तीन गावच्या श्री सुखाई वरदायिनी महाकाली देवींचा वार्षिक भव्य यात्रा उत्सव बुधवार, १८ फेब्रुवारी रोजी कुंभार्ली येथे संपन्न होत आहे. यामध्ये सकाळी ७ ते ९ वाजण्याच्या दरम्यान देवीला अभिषेक व रुपी लावणे. सकाळी ९ ते १० देवींची पूजा व आरती, सकाळी १० ते ११ लाट चढवणे, सकाळी १२ ते २ अन्नप्रसाद, सकाळी ११ ते २ श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल शिरगाव, समर्थ रक्तपेढी डेरवण आणि महाकाली देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दुपारी ३ ते ४ मांड भरणे, लाट प्रदक्षिणा, सायंकाळी ४ ते वाजता पारंपरिक ढोल वाद्य, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ, सायंकाळी ६ वाजता कबड्डीचा अंतिम सामना व बक्षीस समारंभ, सायंकाळी ७ ते रात्री वाजता ८ मयूर उबाळे प्रस्तुत जय जगदंबा संबळ पथक, रात्री १० वाजल्यानंतर वसंतराव वाडेकर यांचा लोकनाट्य तमाशा होईल. देवींच्या वार्षिक भव्य यात्रोत्सवाला भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भाविकांकरता चिपळूण डेपोतून खास यात्रेसाठी एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे.

Valentine Day 2026: 14 फेब्रुवारीला चंद्र बदलणार आपली स्थिती, या जोडप्यामधील कमी होईल दुरावा

यात्रोत्सवाची वैशिष्ट्ये

यात्रोत्सवाच्या दिवशी पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होते. त्यानंतर अभिषेक, महापूजा, आरती, हरिनाम सप्ताह, भजन-कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. मंदिर परिसर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवला जातो. देवीची पालखी काढण्यात येते, ज्यात गावातील सर्व समाजबांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.

Astro Tips: सोने परिधान केल्याने ग्रहदोष वाढतो का? जाणून घ्या राशीनुसार शुभ अशुभ परिणाम

भक्तांसाठी श्रद्धेचा दिवस

अनेक भाविक या दिवशी उपवास करतात, देवीचे नामस्मरण करतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. स्थानिक परंपरेनुसार, या दिवशी देवीच्या दर्शनाने वर्षभर सुख-समाधान लाभते, अशी श्रद्धा आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुखाई वरदायिनी महाकाली देवींचा वार्षिक भव्य यात्रोत्सव कधी आणि कुठे आहे

    Ans: सुखाई वरदायिनी महाकाली देवींचा वार्षिक भव्य यात्रोत्सव 18 फेब्रुवारी रोजी कुंभार्ली (चिपळूण तालुका) येथे संपन्न होत आहे.

  • Que: या यात्रेचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: महाकाली देवी ‘सुखाई वरदायिनी’ या नावाने प्रसिद्ध असून ती आपल्या भक्तांना सुख, समृद्धी, रक्षण आणि नकारात्मकतेपासून मुक्ती देणारी देवी मानली जाते. वार्षिक यात्रोत्सव तिच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी आणि भक्तीभाव व्यक्त करण्यासाठी उत्तम संधी आहे.

  • Que: : भक्तांना खास सोयी-सुविधा उपलब्ध आहेत का?

    Ans: हो. यात्रेच्या दिवशी भाविकांसाठी चिपळूण डेपोतून खास एसटी बसेस सोयीचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रवास अधिक सुलभ होतो.

Web Title: Sukhai vardayini mahakali yatra 18 february features of the yatra festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Nagpanchami 2026: यंदा कधी साजरी होणार नागपंचमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
1

Nagpanchami 2026: यंदा कधी साजरी होणार नागपंचमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Trigrahi Yog: त्रिग्रही योगामुळे बदलणार या राशींच्या लोकांचे नशीब, व्यापार-व्यवसायात मिळणार भरघोस फायदा
2

Trigrahi Yog: त्रिग्रही योगामुळे बदलणार या राशींच्या लोकांचे नशीब, व्यापार-व्यवसायात मिळणार भरघोस फायदा

Sun Transit 2026: सूर्य स्वतःच्या राशीमध्ये करणार प्रवेश, या राशींच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळणार अपेक्षित यश
3

Sun Transit 2026: सूर्य स्वतःच्या राशीमध्ये करणार प्रवेश, या राशींच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळणार अपेक्षित यश

Khagras solar eclipse: खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय? जाणून घ्या माहिती
4

Khagras solar eclipse: खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय? जाणून घ्या माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.