
फोटो सौजन्य- pinterest
पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा. त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा आणि त्यांना नैवेद्य म्हणून पंचामृत, तुळस आणि चण्याची टाळ किंवा बेसन चे लाडूचे नैवेद्य दाखवा.
पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर दूध, दही आणि मधाने अभिषेक करा आणि शिवचालिसाचे पठण करा. धार्मिक श्रद्धेनुसार अडकलेली कामे पूर्ण होतात आणि प्रगती देखील होते.
पौर्णिमेच्या रात्री दुधामध्ये साखर आणि तांदूळ मिसळून चंद्र देवाला अर्ध्य दे. अर्ध्य देतेवेळी ॐ ऐं क्लीं सोमाय नमः या ॐ स्त्रां स्त्रीं स्त्रों सः चंद्रमसे नमः या मंत्रांचा जप करा. असे मानले जाते की त्यामुळे आर्थिक समस्या दूर होते.
मार्गशीर्ष पौर्णिमेला लाल चुनरी आणि दूध अर्पण करावे. यामुळे शांती, आनंद आणि प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत होते असे म्हटले जाते.
पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पिठाचा दिवा बनवा, त्यात तिळाचे तेल टाका आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि तुमची इच्छा व्यक्त करा. असे म्हटले जाते की या उपायाने आर्थिक अडचणी दूर होतात.
करिअर आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठीपौर्णिमेच्या दिवशी गरीब व्यक्तीला पिवळे धान्य, तूर किंवा पिवळी मिठाई दान करा. असे मानले जाते की यामुळे नशिबाची साथ मिळते.
पौर्णिमेच्या दिवशी घरी सत्यनारायणाच्या कथेचे पठण केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आशीर्वाद मिळतात. शिवाय, व्यक्तीला त्यांच्या करिअर किंवा व्यवसायात कोणत्याही अडचणी येत नाहीत.
पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळद आणि पाण्याची पेस्ट बनवा आणि मुख्य दरवाजावर स्वस्तिक आणि ओम काढा. असे मानले जाते की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मार्गशीर्ष महिना विष्णूचा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. पौर्णिमेच्या दिवशी केलेली पूजा, जप आणि उपाय यामुळे करिअर व्यवसायात प्रगती होते
Ans: सकाळी स्नानानंतर पिवळ्या कपड्याच 5 हळदीचे तुकडे आणि एक रुपयाचे नाणे गुंडाळून देव्हाऱ्यात ठेवा.
Ans: घराच्या उत्तर दिशेला श्रीकुबेराची पूजा आणि धूप दिप लावणे शुभ मानले जाते