फोटो सौजन्य- pinterest
मिथुन संक्रांती आज रविवार, 15 जून रोजी आहे. या दिवशी पूजा करण्यासाठी महापुण्यकाळाची सुरुवात सकाळी 6.53 पासून झाली असून त्याची समाप्ती 9.12 पर्यंत आहे. यावेळी सूर्यदेवाची पूजा करुन त्याला जल अर्पण केल्याने पुण्य लाभते, अशी मान्यता आहे. तसेच गायत्री मंत्रांचा जप करुन तुमच्या राशीनुसार काही वस्तूंचे दान केल्याने सूर्य देव प्रसन्न होतात, अशी देखील धार्मिक श्रद्धा आहे. मिथुन संक्रांतीच्या दिवशी राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे, जाणून घ्या
मिथुन संक्रांतीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी गूळ, लाल वस्त्र, तांब्याची भांडी आणि गहू या गोष्टींचे दान करावे. दान करत असताना ओम घृणी सूर्याय नम: या मंत्रांचा जप करणे फायदेशीर ठरेल.
मिथुन संक्रांतीच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी गाईला गूळ आणि चपाती खायला द्यावी. तसेच तांब्याचे नाणे आणि लाल चंदन दान करावे.
या राशीच्या लोकांनी संक्रांतीच्या दिवशी गहू, तांब्याची भांडी, लाल मिरची, रोली इत्यादी दान करावे. त्याशिवाय आदित्य हृदय स्तोत्राचे पठण केल्याने तुम्हाला जीवनामध्ये अनेक फायदे होतील.
कर्क राशीच्या लोकांनी मिथुन संक्रांतीच्या दिवशी लाल फुले, सफरचंद, डाळिंब, लाल कपडे इत्यादी दान करावेत. या गोष्टी दान केल्याने सूर्य देव तुमच्यावर प्रसन्न होतात असे म्हटले जाते.
सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्याने या राशीच्या लोकांनी लाल चंदन, तांब्याचे नाणे, गूळ, साखर इत्यादी दान करावे. त्याचबरोबर ओम आदित्याय नम: या मंत्रांचा देखील जप करावा. यामुळे तुम्हाला जीवनात कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.
कन्या राशीच्या लोकांनी तांब्याचे प्लेट, गहू आणि सूर्य देवाचे चित्र दान करावे. याचा तुम्हाला फायदा होईल.
या राशीच्या लोकांनी लाल रंगांचे वस्त्र आणि सूर्यदेवतेची मूर्ती दान करावी. त्यानंतर सूर्यदेवासमोर दिवा लावून ध्याने करावे, यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी तांब्याची भांडी, सूर्यफूल बियाणे, गूळ, हरभरा इत्यादी दान करावे. असे केल्याने सूर्यदेवाचा कायम तुमच्यावर आशीर्वाद राहते, अशी मान्यता आहे.
धनु राशीच्या लोकांनी सूर्य देवाशी संबंधित पुस्तके, तांबे आणि लाल ब्लँकेट दान करावे. तुम्ही ओम सूर्याय नम: या मंत्राचा जप करावा हे सर्व केल्याने तुमच्या जीवनातील अडी अडचणी दूर होतील असे म्हटले जाते.
या राशीच्या लोकांनी मिथुन संक्रांतीच्या दिवशी लाल चंदन, शेंगदाणे, लाल रंगाचे पुस्तक, गहू इत्यादी दान करावे. असे केल्याने तुमची समाजातील प्रतिष्ठा वाढते असे म्हटले जाते.
मिथुन संक्रांतीला लाल मसूर, तांब्याचे भांडे आणि डाळिंब दान करावे. या गोष्टी दान करणे फायदेशीर ठरते. तसेच सूर्याला जल अर्पण करुन आदित्य हृदय स्तोत्राचे वाचन करावे.
या राशीच्या लोकांनी पिवळी आणि लाल फुले, तांब्याचा फ्रेम असलेला आरसा, गूळ आणि ब्रेड दान करावेत. असे केल्यास तुमच्यावर कायम सूर्यदेवाचा आशीर्वाद राहतो, अशी मान्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)