फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवार, 16 जून रोजी ग्रह एका विशिष्ट स्थितीत येणार आहे. या दिवशी चंद्र आपले संक्रमण कुंभ राशीमध्ये करणार आहे. यावेळी राहू ग्रह तिथे आधीच विराजमान आहे. ज्यावेळी राहू आणि चंद्र एकत्र येतात त्या स्थितीला ग्रहण योग असे म्हटले जाते. या योगाचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक, भावनिक आणि व्यावहारिक जीवनावर होतो.
चंद्र हा मन, भावना आणि चेतना दर्शवतो आणि राहू ग्रह छाया ग्रह आहे. तो व्यक्तीच्या जीवनामध्ये गोंधळ, चिंता आणि अनिश्चितता तयार करतो. अशा वेळी हे दोन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये मानसिक गोंधळ, ताण, चिंता यांसारख्या गोष्टी उद्भवतात. या सर्व गोष्टींचा नकारात्मक परिणाम काही राशीच्या जीवनावर होतो. कोणत्या राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल आणि कोणते उपाय करावेत, जाणून घ्या.
या संक्रमणाचा परिणाम म्हणजे मेष राशीच्या लोकांच्या जीवनात मानसिक अस्थिरता, चिडचिडेपणा आणि भावनिक असंतुलनाचा सामना करावा लागू शकतो. करिअरच्या बाबतीत या लोकांना कोणत्याही मोठ्या निर्णयांमुळे या लोकांच्या मनात गोंधळ उडू शकतो. परिवारामध्ये गैरसमज वाढण्याची शक्यता देखील संभावते. नात्यांमधील ताण वाढू शकतो. त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी सोमवारी शिवलिंगावर पाणी, बेलपत्र, दूध या गोष्टी अर्पण करावे. तसेच ॐ चंद्राय नम:’ या मंत्रांचा 108 वेळा जप करावा.
राहू आणि चंद्राच्या युतीचा परिणाम वृषभ राशीच्या लोकांवर होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांना अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. जर तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकते. शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हानिकारक ठरु शकते. यामुळे वृषभ राशीच्या लोकांनी शनिवारी काळे तीळ, मोहरीचे तेल आणि उडीद डाळ दान करा. तसेच ‘ओम भ्रम भ्रम भ्रम सह राहवे नम: या राहू ग्रहांच्या मंत्रांचा जप करावा.
राहू आणि चंद्राच्या युतीचा परिणाम मिथुन राशीच्या लोकांवर होऊ शकतो. या राशीच्या आरोग्याच्या बाबतीत या लोकांना सावधानगिरी बाळगावी लागेल. मानसिक थकवा, निद्रानाश किंवा उच्च रक्तदाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या लोकांनी दररोज ‘ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करावा. तसेच बुधवारी गरीब विद्यार्थ्यांना पेन, प्रती, पुस्तके इत्यादी स्टेशनरी दान करा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)