Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झावळ्यांच्या रविवारनिमित्त इम्मानुएल चर्चकडून प्रभात फेरी; ख्रिस्ती बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

'होसान्ना, होसान्ना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो...! अशी घोषवाक्य गुरुवार पेठ आणि परिसरात ऐकायला मिळाली. इम्मानुएल चर्चकडून रविवारी (दि.29) सकाळी झावळ्यांचा रविवारनिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 29, 2026 | 03:42 PM
ख्रिस्ती बांधवांकडून झावळ्यांचा रविवारनिमित्त गुरुवार पेठेत प्रभातफेरी

ख्रिस्ती बांधवांकडून झावळ्यांचा रविवारनिमित्त गुरुवार पेठेत प्रभातफेरी

Follow Us
Follow Us:

पुणे : ‘होसान्ना, होसान्ना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो…! अशी घोषवाक्य गुरुवार पेठ आणि परिसरात ऐकायला मिळाली. गुरुवार पेठेतील इम्मानुएल चर्चकडून रविवारी (दि.29) सकाळी झावळ्यांचा रविवारनिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर चर्चमध्ये उपासना केली गेली. यावेळी चर्चचे प्रेसबिटर इन्चार्ज रेव्ह. विजय म्हंकाळे यांच्यासह अनेक ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.

सध्या ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सप्ताह सुरु आहे. शहरातील अनेक चर्चकडून झावळ्यांचा रविवारनिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. ख्रिस्ती धर्मात झावळ्यांचा रविवार या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. या दिवसाचे स्मरण ठेऊन ख्रिस्ती बांधव आजही हा दिवस पाळत आहेत. गाढवाच्या शिंगरावर बसून यरूशलेमेत प्रभू येशू ख्रिस्तांनी जयोत्सावाने केलेला प्रवेश म्हणून या दिवसाची आठवण केली जाते. येरूशलेममध्ये इसवी सन चौथ्या शतकाच्या पूर्वीपासून झावळ्यांचा रविवार, मौंदी गुरूवार, उत्तम शुक्रवार व पुनरूत्थान दिन हे दिवस अत्यंत भक्तीभावाने साजरे करण्यात येत असत.

हेदेखील वाचा : Sanjay Raut On Ashok Kharat : “अशोक खरातांच्या पाठीशी सरकार…”, संजय राऊतांच्या आरोपांनंतर राजकारणात खळबळ

चर्चकडून काढण्यात आलेल्या या प्रभातफेरीत रेव्ह. म्हंकाळे, चर्च सचिवा किशोरी पाटोळे, खजिनदार प्रविण गायकवाड यांच्यासह अनेक चर्च सभासद उपस्थित होते. या प्रभातफेरीनंतर चर्चमध्ये उपासना घेण्यात आली. यावेळी चर्चमध्ये तरुण संघाने गाणे सादर केले.

ख्रिस्ती समाजबांधवांचा 40 दिवसांचा पवित्र समय

सध्या ख्रिस्ती समाजबांधवांचा 40 दिवसांचा पवित्र समय सुरु आहे. प्रभू येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ हे दिवस पाळण्यात येतात. या 40 दिवसांच्या उपास समयात पुष्कळ ख्रिस्तीबांधव पापांबद्दल झालेले दुःख व्यक्त करण्यासाठी उपास करतात. दरवर्षी राखेचा बुधवार अर्थात ‘अॅश वेनस्डे’ या दिवसापासून उपासाला सुरुवात होत असते. त्यानंतर पुनरुत्थान दिन अर्थात ‘ईस्टर संडे’ या दिवशी या उपास समयाची सांगता केली जाते.

झावळ्यांच्या रविवारनिमित्त इम्मानुएल चर्चकडून प्रभात फेरी; ख्रिस्ती बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Web Title: Morning procession by christian brethren in guruwar peth on the occasion of palm sunday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • Cultural Event

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.